अब की बार महिला आमदार
सांगलीः 'अब की बार... महिला आमदार', असा नारा देत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांना आमदार करण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार केला. २८ रोजी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत वसंतदादा पाटील व मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी काँग्रेस कमिटीत झाला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत थांबलो. पण या निवडणुकीत थांबणार नाही. आता त्यांनी थांबावे, असे आवाहन जयश्री पाटील यांनी केले. प्रतीक पाटील यांनी आमदार विश्वजित कदम यांनी स्वतः जयश्री पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करावेत. त्यांच्यासाठी ही गोष्ट अवघड नसल्याचे सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील थांबल्या. प्रत्येक निवडणुकीत दादा घराण्याचा बळी का? असा सवाल करत उमेदवारी दाखल करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी प्रा. सिकंदर जमादार, संग्राम पाटील, किशोर शहा, कांचन कांबळे, सुभाष खोत, उत्तम साखळकर, पी. एल. रजपूत, शेवंता वाघमारे, संतोष पाटील, रोहिणी पाटील, अजित सूर्यवंशी, कयूम पटवेगार, आनंद लेंगरे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.