शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल झाले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज सकाळी गिरगाव येथील रिलायन्सच्या हरकिशन दास रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले होते. सकाळी 8 वाजल्यापासून गिरगाव येथील रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर अजियोग्राफी होण्याची शक्यता आहे.
16 जुलै 2012 रोजी उद्धव ठाकरे यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि आले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्याच्या धमन्यांमधील तिन्ही ब्लॉकेजेस यशस्वीरित्या काढण्यात आल्या. 12 नोव्हेंबर 2021 रोजी, HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली. या दरम्यान उद्धव राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्यावरील या किचकट शस्त्रक्रियेबाबत जनतेशी संवाद साधताना माहिती दिली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.