Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का; समीर भुजबळ शरद पवारांच्या संपर्कात?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का; समीर भुजबळ शरद पवारांच्या संपर्कात?
 

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या तुतारी हाती घेण्यासंदर्भात हाचलाची सुरू झाल्या आहेत.

किंवा ते अपक्ष निवडणूक देखील लढू शकतात अशी चर्चा सुरू आहे. समीर भुजबळ हे नांदगावमधून निवडणूक लढववण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. शिवसेना नेते सुहास कांदे यांना इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळणार नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समीर भुजबळ हे नांदगावमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेचा असल्यामुळे समीर भुजबळ यांच्याकडून वेगळ्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. समीर भुजबळ हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. समीर भुजबळ हे एकतर तुतारी हाती घेणार किंवा अपक्ष निवडणूक लढवणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता, अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीला लोकसभेत मोठं यश मिळालं. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना कोणत्या आणि किती जागा मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

उमेदवारांची यादी प्रसिद्धी होण्यापूर्वीच अनेक इच्छूक हे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा इच्छूकांच्या नाराजीचा फटका हा महायुती आणि महाविकास आघाडी असा दोन्हीकडे देखील बसू शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ही बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान राजकीय पक्षांपुढे असणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.