लाडक्या बहिणी पृथ्वीराजबाबांच्या पाठीशी ठाम महिला मेळाव्यात निर्धार ः महिलांना न्यायासाठी रस्त्यावर उतरणारा आमदार हवा
सांगली :- महिलांच्या प्रश्नावर पृथ्वीराज बाबा पाटील हेच रस्त्यावर उतरले. स्वच्छतागृहाचा प्रश्न असेल किंवा महिला व मुलींवर होणारा अत्याचार असेल, याविरोधात ठाम भूमिका घेतली. असाच नेता सांगलीचा आमदार झाला पाहिजे. त्यासाठी काँग्रेसच्या महिला भगिणी, लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहतील, असा विश्वाज आज काँग्रेस महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
सांगली विधानसभा क्षेत्रातील विविध महिला संघटनांच्या महिलांनी एकत्र येत आज बैठक घेतली. काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना सांगली विधानसभा मतादर संघातून उमेदवारी द्यावी. अन्यथा बाबांनी बंडखोरीशिवाय पर्याय राहणार नाही. लढणाऱ्या नेत्यावर अशी वेळ आणू नका. महिलांच्या पाठीशी ठाम उभा राहणारा नेता सांगलीला हवाय, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभेत खा. विशाल पाटील यांना निवडून देऊन महिलांनी ताकद दाखवली, तशीच ताकद पृथ्वीराजबाबा पाटील यांना निवडून आणण्यासाठी सांगलीच्या रणरागिणी जीवाचे रान करतील, असा निर्धार करण्यात आला. पृथ्वीराज पाटील यांनी केलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गेली दहा वर्षे संकट काळात पक्ष वाढवला आहे. गेली पाच वर्षे ताकदीने पक्षाची बांधणी केली आहे. सामान्य माणसापर्यंत पोहचून काँग्रेसच्या विचारांची मजबूत मोट बांधली आहे. कुणाच्या दबावामुळे त्यांना डावलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तर सांगलीकर महिला ते सहन करणार नाहीत, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला.
बिपीन कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विजया पाटील, आशाताई पाटील, विशाखा पाटील, प्रणिता पवार, जयश्री घोरपडे, उषा पाटील, मिनाक्षी दुग्गे,भारती भगत, ज्योती सुर्यवंशी, मंगल जवळेकर, रेश्मा मुजावर, किर्ती देशमुख, शोभाताई, सुवर्णा पाटील, उषा पाटील, नर्मदा साळुंखे, कल्पना शेळके, कविता चौधरी यांनी मत मांडले. यावेळी श्रीमती रोहिणी शिवराज पाटील, माजी नगरसेविका आरती वळवडे, प्रतिभा कुलकर्णी, प्रतिक्षा काळे, सीमा कुलकर्णी,सुनिता शेरीकर, श्रीदेवी कुल्लोळी, सुनिता व जयश्री अमृतसागर, ललिता परीट, उषा पाटील, सबिना मुजावर,मिनाक्षी चव्हाण, सरीता व संगिता शिंदे, शमशाद नायकवडी, सारीका, जयश्री व उल्का पवार, निर्मला कदम, माधुरी पाटील, शोभा जाधव, सविता व अवनी चौधरी, शोभा चव्हाण, संगिता वडर, अनिता भगत, तृप्ती पाटील, वंदना कदम, संध्या नाईक, शैलजा निकम, नाझिया शेख, सविता चव्हाण, कमल सुर्यवंशी, आशा भोसले व अलका साबळे, आरती चव्हाण, अलका एडके, सुभद्रा गोरे,राणी पाटील, साजिदा तांबोळी, सरस्वती आवटी, सुचित्रा चित्रागर, नर्मदा साळुंखे, रेखा लोहार, अंजुबी मणेर, करीश्मा व जमेला अपराज, पूजा कुंभार, अनिता धायगुडे, रेखा दळवी, सुप्रिया घार्गे, मंगल बंडगर, आश्विनी तवटे, यास्मिन जमादार, अनिता व सुवर्णा माने, सुरय्या व शमा अत्तार, शबाना मणेर, अर्चना कबाडे, निता अहीर, माधवी शिंदे, सुषमा देसाई, मंगल जवळेकर,सुजाता भगत, पुष्पलता पाटील, बाळाबाई हंडे, राजश्री कलाल, भारती पालेकर, अपेक्षा मगदूम व विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी व सदस्य आणि महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.