राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांची उमेदवारी रद्द? भाजपच्या विरोधामुळे अजित दादांचा मोठा निर्णय? जाणून घ्या.
मुंबई: राज्यात विधानसभा निवणदुकीची घोषणा झाली आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. महायुतीमधून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
आतापर्यंत महायुतीने १८२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीची अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि अन्य महत्वाचे नेते या बैठकीत उपस्थित आहेत. दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे काही माध्यमांच्या माहितीनुसार समोर येत आहे. याबद्दल अजून खात्रीशीर वृत्त समोर आलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आज दिल्लीत सुरू असलेल्या बैठकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक निर्णय झाला नसल्याचे म्हटले जात आहे. नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले होते. ज्यावेळेस राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष फुटला तेव्हा नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस भाजपच्या अनेक नेत्यांकडून त्यांना विरोध करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांना थेट पत्र लिहून आपले म्हणणे मांडले होते.महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांच्यावर देशविघातक कृत्य केल्याचा देखील आरोप होता. त्यानुसार महायुतीने नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे. नवाब मलिक हे अणुशक्ती नगर येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र भाजपच्या विरोधामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजते आहे. त्यानंतर अमित शाह यांनी नवाब मलिक यांचे उमेदवारी रद्द करण्याबाबत सांगितले असल्याचे मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. मात्र याबाबत अजून खात्रीशीर वृत्त समोर आलेले नाही.
नवाब मलिकांना भाजपचा विरोध का?
महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. दिवाळीनंतर या प्रकरणात बॉम्ब फोडणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या आरोपांनंतर काही वेळातच नवाब मलिक यांचीही पत्रकार परिषद होणार आहे, त्यात मलिक या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीला अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमले असा आरोप केला होता.
ईडीने का केली अटक?
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. गोवावाला कंपाऊंड जमीन व्यवहार प्रकरणातील मनी लाँड्रिंगमुळे नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या. दाऊदशी संबंधित सलीम फ्रूटशी व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. ऑगस्ट २०२३ मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. आजारपणाच्या व प्रकृतीच्या कारणावरुन वैद्यकीय जामीन देण्यात आला होता. त्यावेळी जामीन अर्जामध्ये किडनी, यकृत, हृदय यासंबंधित व्याधी असल्याचं नमूद केलं होतं. त्यामुळे वैद्यकीय जामीन ऑगस्ट २०२३ मिळाला असून यापुढेही त्यांचा जामीन कायम राहणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.