Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या

नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या
 

आदीवासी आरक्षणात इतर कोणत्याही जातीच्या समावेश करू नये अशी मागणी करत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून जाळीवर उड्या मारल्या आहेत. त्यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ उडाला होता.

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू होत्या. अशात राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध केला आहे.

दोन दिवसांपूर्वी हे सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. अनेक तास वाट पाहिल्यानंतरही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेतली नसल्याने हे सर्व आमदार संतापले होते. दरम्यान या सर्व आमदारांना जाळीतून बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी नरहरी झिरवळ यांचा रक्तबाद वाढल होता. अशा अवस्थेतही झिरवळ आणि सर्व आदिवासी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आग्रही आहेत.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.