Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News!अभिनेता गोविंदाला लागली स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी; ICU मध्ये दाखल

Breaking News!अभिनेता गोविंदाला लागली स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी; ICU मध्ये दाखल
 

अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याची बातमी समोर आली आहे. स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली आणि ती गोविंदालाच लागली आहे. यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. अभिनेता गोविंदाला ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे.
 
गोविंदाच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चित्रपट अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची बातमी समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. गोविंदाकडून स्वतःच्याच रिव्हॉल्व्हरने पायात गोळी झाडली गेली असल्याच सांगण्यात येत आहे. रिव्हॉल्व्हरचे कुलूप उघडे असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गोविंदाच्या मॅनेजरने दिली माहिती

अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा कोलकात्याला रवाना होण्याच्या तयारीत होता. त्या दरम्यान, परवाना असलेला रिव्हॉल्व्हर ठेवत असताना हातातून पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली, अशी माहिती गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तो सध्या रुग्णालयात आहे, अशी माहिती ANI ला देण्यात आली आहे. गोविंदाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाने उपचार करून पायातली गोळी काढली असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या गोविंदाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.