महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व यंत्रणा राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात एसएसटी नियुक्त करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी एसएसटीने मुंबईतून 10.8 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. तपास पथकाने मुंबईतील मरीन ड्राईव्हवर संशयावरून एक कार अडवली आणि तिची तपासणी केली असता, त्यातून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन जप्त करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
कारमधून जप्त करण्यात आलेल्या चलनात यूएस आणि सिंगापूर डॉलरसह अनेक देशांच्या चलनांचा समावेश आहे. चलनासह पकडलेल्या व्यक्तीने बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेची कागदपत्रे सादर केली असून, विमानतळावरून हे चलन मिळाले असून ते बँकेत नेत असल्याचा दावा केला आहे.कारमधून जप्त करण्यात आलेले चलन मोठ्या प्रमाणात असून ते पुढील तपासासाठी कस्टमकडे सोपवण्यात आले आहे.
मात्र, चौकशीदरम्यान कार चालकाने स्पष्ट माहिती दिली नाही. तपास पथक जप्त केलेल्या रोकडची तपासणी करत आहे. हा पैसा निवडणुकीसाठी वापरला गेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आयकर विभागाला कळवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद सहाय्यक निवडणूक अधिकारी कल्याणी मोहिते यांनी दिली.महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यात 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या, त्यानंतर महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली असून तपास यंत्रणांचे बारीक लक्ष आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.