सांगली, दि. 21 : भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील डाक अदालत दि. 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर सांगली यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे. तक्रारी स्विकारण्याचा अंतिम दि. 19 डिसेंबर 2024 आहे, असे प्रवर डाक अधिक्षक सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे. संबंधितांनी आपली तक्रार तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा याचा सपष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह दि. 19 डिसेंबर 2024 पर्यंत प्रवर अधिक्षक डाकघर सांगली विभाग सांगली यांच्या पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.