Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोलापुरात भाजपच्या माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात पैसे वाटताना वकील सापडला 80 हजार रुपयांची पाकिटे सापडली, पोलिसांत गुन्हा दाखल

सोलापुरात भाजपच्या माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात पैसे वाटताना वकील सापडला 80 हजार रुपयांची पाकिटे सापडली, पोलिसांत गुन्हा दाखल
 
 
येथील शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात रविवारी मध्यरात्री राज मेमोरीयल शाळेसमोरील गोकुळ नगरातील एका अंधाऱ्या खोलीत पाकिटात पैसे वाटप सुरु होते. याची खबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळाली आणि त्यांनी लगचेच त्याठिकाणी धाव घेतली.

त्यावेळी काही पाकिटे व त्यात ५०० रुपयांच्या नोटा घातलेल्या आढळल्या. उपस्थितांनी व्हिडिओ तयार केला आणि गोंधळ निर्माण होत असतानाच एमआयडीसी पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. घटनास्थळावरून ८० हजार रुपयांची रोकड सापडली असून पोलिसांनी या प्रकरणी वकिली व्यवसाय करणाऱ्या रौहन सुनील सोमा (रा. योगेश्वर नगर्, जुने विडी घरकूल) याच्यविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोलापूर शहूर उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी महापौर महेश कोठे व भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात लढत आहे. यावेळी भाजपच्याच माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस पहायला मिळत आहे. या मतदारसंघात चार टर्म आमदार राहिलेले विद्यमान आमदार विजयी होणार की यापूर्वीच्या पराभवाचा वचपा कोठे काढणार, याची उत्सुकता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.