Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बुधगावमधून सुधीरदादांना विक्रमी मताधिक्य देणार ग्रामस्थ कार्यकर्त्यांची ग्वाही; श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रचारास प्रारंभ

बुधगावमधून सुधीरदादांना विक्रमी मताधिक्य देणार  ग्रामस्थ कार्यकर्त्यांची ग्वाही; श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रचारास प्रारंभ
 

सांगली, दि.४: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना बुधगावमधून विक्रमी मताधिक्य देऊ, अशी ग्वाही ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी दिली. बुधगाव (ता. मिरज) येथे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात सुधीरदादा गाडगीळ आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सुधीरदादा यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत, वाद्यांच्या तालावर आणि घोषणांच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले. सुधीरदादांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो,  येऊन येऊन येणार कोण , सुधीरदादांशिवाय हायेच कोण अशा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

सुधीरदादांनी श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. बुधगावसह सांगली  मतदार संघाची आणखी उन्नती करण्यासाठी मला शक्ती आणि आशीर्वाद द्या असे साकडे देवाला घातले.भगिनींनी दादांचे ओवाळून औक्षण केले. नंतर प्रचाराचा नारळ फोडला.  सिद्धोबाच्या नावानं चांगभलं, सुधीरदादांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा पुन्हा एकदा लोकांनी दिल्या आणि सगळा  परिसर दणाणून सोडला.  दादांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली तसेच प्रचार पत्रक दिले.मतदानरुपी आशीर्वाद द्या अशी विनंती केली. 
यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की सुधीरदादांनी बुधगावसाठी १९ कोटी रुपये इतका भरीव  निधी उपलब्ध करून दिला आहे. श्री सिद्धेश्वर मंदिराच्या  जीर्णोद्धारासाठी २५ ते ३० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.बुधगाव ते बिसूर हा रस्ता करून दादांनी बुधगावच्या प्रगतीचा मार्ग खुला केल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळेच आम्ही त्यांना या निवडणुकीत या गावातून विक्रमी  मताधिक्य देणार आहोत. ग्रामस्थांनी केलेल्या सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सुधीरदादा म्हणाले, श्री  सिद्धेश्वरांच्या आशीर्वादामुळे मी बुधगाव गावासाठी आमदार म्हणून विकासकामे करू शकलो. यापुढेही  बुधगाव हे गाव अधिक प्रगत करण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया. मी बुधगावकडे विशेष लक्ष देईन. कारण या गावाने मला नेहमीच चांगली साथ दिली आहे.
 
 सरपंच वैशाली पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम पाटील, उपसरपंच अविनाश शिंदे, बुधगाव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सयाजीराव कदम, भाजपचे प्रदेश सचिव आश्रफ  वांकर, बुधगाव शहर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष रणजीत माने, विजय गोसावी, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, शुभांगी कोळी, जयश्री पाटील, धनाजी पाटील, मंडल अध्यक्ष स्नेहल होनमोरे, महिला आघाडी अध्यक्ष गीता पाटील, विवेक लुगडे, विजय शेरीकर,भाजप नेते जयवंत पाटील,  विनायक शिंदे, धनाजी पाटील, मनोहर पाटील, अजय कांबळे, स्नेहल व्हनमोरे, शुभांगी कोळी, संभाजी पाटील, गजानन लाटणे,  मंदार भाकरे, विजय भाकरे, अनिल पाटील, श्रीकांत नांदरेकर, सुधीर भाकरे, रमेश कोळी, अतुल होवाळे, सार्थक चव्हाण, संजय चव्हाण  यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
फोटो कॅप्शन 

सांगली : बुधगाव येथे सुधीरदादा गाडगीळ यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन नारळ फोडून निवडणूक प्रचाराचा प्रारंभ केला. दादांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.