Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय गांधी झोपडपट्टी जवळील भीमनगरमधून आमदार सुधीर गाडगीळ ह्यांना भरघोस मतदान :,कोपरासभेत रहिवाशांची ग्वाही; झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन दादाच करतील

संजय गांधी झोपडपट्टी जवळील भीमनगरमधून आमदार सुधीर गाडगीळ ह्यांना भरघोस मतदान :,कोपरासभेत रहिवाशांची ग्वाही; झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन दादाच करतील
 

सांगली, दि.७ : प्रभाग क्रमांक दहामधील भीमनगरमधून सुधीरदादा गाडगीळ ह्यांना भरघोस मतदान करू, अशी ग्वाही तेथील रहिवाशांनी दिली. सांगली विधानसभा मतदारसंघातील  भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी आयोजित कोपरा सभेत अनेक रहिवासी उत्स्फूर्तपणे बोलले. त्यांनी दादांना पाठिंबा जाहीर केला तसेच भरघोस मतदान करण्याची ग्वाही दिली.

प्रभाग क्रमांक दहामधील संजयनगर झोपडपट्टीनजीक भीमनगर येथे सुधीरदादांच्या प्रचारासाठी कोपरा सभा झाली. अत्यंत उत्साहात झालेल्या या सभेस मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.त्यांनी घराचे प्रश्न सोडवण्यासाठी सुधीर दादांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि या निवडणुकीतही दादांना साथ देऊ असे  जाहीर केले.

या भागातील नेते सुरजमामा पवार म्हणाले, झोपडपट्टीवासियांना सुविधा मिळाव्यात. त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी आपण अनेक आंदोलने केली. यापूर्वी आपल्या या भागाकडे कुणीही लक्ष देत नव्हते; परंतु गेल्या दहा वर्षात सुधीरदादांनी मात्र सातत्याने आपले प्रश्न समजावून घेतले. ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा विषयसुद्धा दादाच निश्चितपणे मार्गी लावतील.त्यामुळे या निवडणुकीतही येथील सर्व रहिवासी सुधीरदादांच्याच पाठीशी राहणार आहेत.  गीताताई पवार यांनीही सुधीरदादा यांनाच भरघोस मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.
 
 भाजपचे ज्येष्ठ नेते मुन्ना कुरणे म्हणाले, गेली दहा वर्षे मी सुधीरदादांचे काम जवळून पाहत आहे. गोरगरीब, झोपडपट्टीवासीय, कष्टकरी यांच्या मदतीसाठी ते सातत्याने तत्पर असतात. धर्म, जात, पक्ष असा कोणताही  भेदभाव न करता ते सर्वांची कामे करतात. झोपडपट्टी पुनर्वसनाचा विषयसुद्धा सुधीरदादाच निश्चित मार्गी लावतील. आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, संजयनगर झोपडपट्टी तसेच भिमनगर येथील रहिवाशांनी नेहमीच मला पाठबळ दिले आहे. त्यांच्या  सहकार्यामुळेच मी गेल्या दहा वर्षात या भागात विकासकामे करू शकलो. यापुढे आपल्याला सर्वांना एकजुटीने या भागाचा आणखी विकास करण्यासाठी काम करायचे आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेवक अनारकली कुरणे, सुजित काटे ,जमीर कुरणे, सुरज पवार, अमित भोसले, अरुण आठवले, आयुबभाई पटेल, आशाताई सांबरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

फोटो 
 
सांगली : प्रभाग क्रमांक दहामधील भीमनगर येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी कोपरा सभा झाली. सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.