राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने त्यांची बदली करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्याच चर्चेत आल्या होत्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार २९ डिसेंबर २०२३ रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घेत ४ जानेवारी २०२४ रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली. त्यानंतर त्यांना मुदतवाढही देण्यात आली.
पहिल्या महिला पोलीस महासंचालक राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्यांपैकी एक, आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.