भाजपा सरकारच्या काळात महागाईने गाठला कळस,जयश्री पाटील ; माधवनगर मध्ये झंजावती प्रचार दौरा व कॉर्नर सभा संपन्न
सांगली, ता.१३ : भाजपा प्रणित महायुतीने महिलांना लाडकी बहीण ही योजना निवडणुकीच्या अगोदर सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले . परंतु ऐन दिवाळीत जीवनावश्य वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची कात्री लागली. आपलेच पैसे आपल्याला देण्याचा प्रयत्न म्हणजे सरळ सरळ लोकांची फसवणूक केली आहे . त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता महायुतीला आलेल्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही अशी घणघणीत टीका जयश्री पाटील यांनी केली.
सांगली विधानसभा क्षेत्राच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा माधवनगर येथे झालेल्या प्रचार दौरा दरम्यान कॉर्नर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी हर्षवर्धन पाटील, गीतांजली पाटील, शशिकांत आवटी, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोसावी गल्ली, रविवार पेठ पाण्याची टाकी, कॉटन मिल चाळ, अवचित नगर, चांदणी चौक, अहिल्यानगर यासह आदी ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील म्हणल्या, भाजपा सरकारच्या मुख्य बारा योजना आहेत. त्या तळागाळातल्या महिलांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. ह्या योजना ठेकेदारांच्या भल्यासाठी आहेत. ठेकेदारांचे भलं करण्याचं काम भाजप सरकारने केला आहे. मोदी सरकारने जनतेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवले. आणि राज्य सरकारने पंधराशे दिले. यामुळे महायुती सरकारकडून दिशा भुल करण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. महागाई, बेरोजगारी, कररूपी पैशांची चोरी, सर्वसामान्य जनतेवर घरपट्टीपासून जीवनावश्यक वस्तूंवर लादलेला कराचा बोजा, श्रीमंतांना सूट पण गरिबांची लूट असा कारभार सध्या राज्यात सुरू आहे. लोकांची फसवणूक करणारे हे सरकार आहे. या विरोधात विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही दिली तसेच सर्वसामान्य लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मतही जयश्री पाटील यांनी व्यक्त केली.माधवनगर मधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, झोपडपट्टी वासियांचे स्थलांतरण करण्याची ग्वाही दिली. यावेळी सरपंच अंजू थोरो, पंचायत समिती उपसभापती उदय पाटील, माजी उपसरपंच माणिक पाटील, अमर पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, दत्ता शिंदे, संजय गोसावी, अनिल गोसावी, प्रताप विचारे, स्वप्निल जमदाडे, किरण पवार, बबन आवळे, नितीन पाटील, बाळासाहेब मगदूम, दीपक कांबळे, अण्णा बेले, मोहन कांबळे, रवी बेले, मोहन पाटील, मनोज पाटील, तेजस पाटील, गणेश देशमुख, निजाम पठाण, रेखा शेंडे, सुनिता जाधव, जितेंद्र मासाळे, प्रकाश माळी, जयवंत सटाले, दिलीप खाडे, अँड.फारुक मुजावर यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.