Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माधवनगर आदर्श गाव बनवू :, सुधीर दादा गाडगीळ

माधवनगर आदर्श गाव बनवू :, सुधीर दादा गाडगीळ 


सुधीरदादा गाडगीळ;  बाईक रॅलीने उत्साहात प्रचाराचा प्रारंभ
 
सांगली, दि. १० : माधवनगरमध्ये रस्ते आणि इतर कामे झाली आहेत. यापुढे नियोजनपूर्वक विकास आराखडा तयार करून माधवनगर आदर्श गाव करू, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. माधवनगर येथील श्री हनुमान मंदिरात सुधीरदादांच्या प्रचाराचा प्रारंभ उत्साहात झाला. त्यावेळी बाईक रॅली काढण्यात आली. माजी आमदार नितीन शिंदे  प्रमुख उपस्थित होते. 

आमदार गाडगीळ म्हणाले, माधवनगर येथे आता व्यापारपेठ चांगल्या पद्धतीने विकसित होत आहे. त्याला अधिक  चालना देऊ. व्यापार पेठेमध्ये  अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करू. माधवनगर येथे सुधीरदादा यांचे फटाक्यांच्या जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले. विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या. 

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजेश आवटी, पंचायतराज जिल्हा सहसंयोजक सुमित निकम, मंडलाध्यक्ष निलेश हिंगमिरे, माधवनगर शहराध्यक्ष मंजीत पाटील, मंडल कोषाध्यक्ष सुहास कलघटगी यांनी दादांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सुधीरदादा यांनी  माधवनगरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले व नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला. त्यानंतर बाईक रॅली निघाली. गोसावी गल्ली येथे दुर्गा माता मंदिर, रेणुका मंदिर, काळुबाई मंदिर,यल्लमा मंदिर येथे दर्शन घेतले.  नारळ फोडला. यावेळी मंदिरात जनसुराज्य पक्षाचे आनंदसागर पुजारी, आकाश गोसावी, विजय जाधव, केतन गोसावी, विजय गोसावी  उपस्थित होते.
  
राधाकृष्ण मंदिरात तसेच हनुमाननगर येथे हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. तिथे महिलांनी सुधीरदादांचे औक्षण केले.  म्हसोबा मंदिर, दत्त गल्ली येथे दत्त मंदिरात दादांनी दर्शन घेतले.  राजेश आवटी, सुमित निकम, विलासदादा आपटे, अण्णा मोने, गणेश वडारकर, रणधीर कुरळे, अभिषेक तिवडे, शैलेश कुरळे, रणजीत मोने, प्रकाश आवळे, यश डागा, मयुरेश कुलकर्णी, आदित्य विचारे, ज्ञानेश्वर केंगार, बाबुराव होनमोरे, प्रसन्न कुलकर्णी, योगेश देसाई, योगेश पाटील, स्मिता जोशी, वंदना ओगले, मंगल वैद्य यांच्यासह कार्यकर्ते महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निवडणूक प्रचाराचा रविवारी माधवनगर येथे प्रारंभ झाला. त्यावेळी दादांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 
2) सांगली: माधवनगर येथील श्री हनुमान मंदिरात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ झाला. त्यावेळी सुधीरदादांचे महिलांनी औक्षण केले. 
 
3) सांगली :आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निवडणूक प्रचारासाठी माधवनगरमध्ये बाईक रॅली काढण्यात आली.
  
4) सांगली: माधवनगर  येथे निवडणूक प्रचार प्रारंभी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.