सांगली: गेल्या दहा वर्षात सांगली मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. स्वच्छ पाणी, प्रदुषणमुक्त शहर, महिला अत्याचाराला प्रतिबंध करण्यासह विविध कामे प्रलंबित आहेत. या मतदारसंघात तुम्ही बदल घडवा, मी सांगली घडवते, असे आवाहन अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी केले.
सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी आज सांगलीतील गणपती मंदिर, दरबार हॉल राजवाडा परिसर येथील योगा केंद्र, प्रताप टॉकीज येथील झुम्बा डान्स ग्रुप आणि एसटी कॉलनी साई मंदिर, विश्रामबाग येथील योगा केंद्रास भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.
क्रीडा क्षेत्रात सांगलीचा नावलौकिक आहे. पण खेळाडूंना सुविधासाठी झटावे लागते. कोरोनानंतर लोक आरोग्याकडे गांभीर्याने पाहत आहेत. योग केंद्रे मोठ्या प्रमाणात आहेत. शहरात योग भवन उभारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शहरासह ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्याची गरज आहे. अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी हिरा या चिन्हासमोरील बटण दाबून मला निवडून द्या, असे आवाहनही जयश्री मदन पाटील यांनी केले. यावेळी बाळकृष्ण चिटणीस, नाना गवळी, अथर्व फिटनेस ग्रुप अर्पणा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
जलाराम मंदिरात घेतले आशिर्वाद
श्री जलाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त रतनशीनगर येथील मंदिरात जयश्री मदन पाटील यांनी भेट देऊन आशिर्वाद घेतले. यावेळी उपस्थित भाविक, महिलांशी संवाद साधला. माहेश्वरी भवन येथे जी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी साथ देण्याची आवाहन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.