पुणे : प्रवासात झालेली ओळख वाढवून इन्स्टाग्रामद्वारे ते जवळ आले. त्यानंतर तरुणाने तिला प्रपोज केला, मात्र त्याला तिने नकार दिला. त्यानंतर तरुणाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्यावरुन तिची बदनामी करण्यास सुरुवात केली.
तरुणाने तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र घालून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार २०२२ पासून १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुरु होता. याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका तरुणावर पोक्सोसहीत विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी तरुणाची ट्रव्हल्समध्ये ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवरुन तरुणीसोबत ओळख वाढवून तिला प्रपोज केला. मात्र, त्याला तरुणीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट बनवून त्याच्यावर ३०० रुपयांमध्ये नाईट फुल असे लिहून त्यावर फिर्यादीचा मोबाईल नंबर टाकून फिर्यादीची बदनामी केली. तरुणीने विचारणा केली असता त्याने तिच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. तरुणीच्या घरी येऊन तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र घातले. दोघेच घरात असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
तरुणीची इच्छा नसतानाही सतत तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी या बहिणीकडे गेल्या असताना आरोपीने तिच्या बहिणीला फोन करुन तिला माझ्याकडे पाठव, नाही तर मी तिचे अश्लिल फोटो इंन्स्टाग्रामवर व्हायरल करेल, अशी धमकी दिली. तसेच बनावट इन्स्टाग्रामवरील फोटो बहिणीच्या इन्स्टाग्रामवर पाठवून फिर्यादीची बदनामी केली. बहिणीचा मोबाईल नंबर टाकून मी आत्महत्या करतो, अशी सुसाईड नोट लिहून तो फोटो इन्स्टग्रामवर पोस्ट केला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.