मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचा चेंडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कोर्टात टाकला आहे. त्यानंतर आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद निश्चित मानले जात आहे.
यातच आता नव्य मंत्रिमंडळात नव्या तरूणांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीत सर्वात जास्त भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांना अधिक जागा देण्यात येणार आहे. त्याचसोबत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला देखील मंत्रिमंंडळात विशेष स्थान देण्यात येणार आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पदाची मागणी केल्याचे समजत आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
देवेंद्र फडणवीसगिरीश महाजनरविंद्र चव्हाणमंगलप्रभात लोढाचंद्रशेखर बावनकुळेआशिष शेलारनितेश राणेशिवेंद्रसिंहराजे भोसलेराहुल कुलमाधुरी मिसाळसंजय कुटेराधाकृष्ण विखे पाटीलगणेश नाईकपंकजा मुंडेगोपीचंद पडळकर
कोणाला डच्चू मिळण्याची शक्यता
विजयकुमार गावित
सुधीर मुनगंटीवार
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
धनंजय मुंडेअदिती तटकरेअनिल पाटीलहसन मुश्रीफधर्मराव बाबा अत्रामअजित पवारछगन भुजबळ
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
संजय शिरसाट
भरत गोगावले
प्रकाश सुर्वे
प्रताप सरनाईक
तानाजी सावंत
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
निलेश राणे
कोणाला डच्चू मिळणार?
दीपक केसरकरअब्दुल सत्तारसंजय राठोड
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.