Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पडळकरांच्या अडचणी वाढणार? जतमध्ये चंद्रकांत पाटील गेले पण...

पडळकरांच्या अडचणी वाढणार? जतमध्ये चंद्रकांत पाटील गेले पण...
 

विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाला बंडखोरीची लागण झाली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बंडोबांना थंडोबा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपमध्येही असे प्रयत्न होताना दिसत आहेत.

सांगलीच्या जत विधानसभा मतदार संघातून भाजपने गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी पडळकरांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. पडळकर हे बाहेरचे आहेत. स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे जतमध्ये गेले होते. पण त्यांना बंडखोरांची समजूत काढण्यात यश आले नाही.

भाजपाचे मंत्री व जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी जत मधली बंडखोरी थोपवण्यासाठी केलेली शिष्टाई निष्फळ ठरली आहे.जत मधील स्थानिक भाजपा नेत्यांनी माघार घेण्याच्या चंद्रकांत पाटलांचा प्रस्ताव धुडकावून लावत आहे. शिवाय विधानसभा निवडणूक लढवणारच अशी भूमिका जाहीर केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी जत विधानसभा मतदारसंघातल्या भाजपच्या बंडखोर आणि नाराज नेत्यांची भेट घेतली. ज्यामध्ये भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप ,अपक्ष अर्ज दाखल केलेले तमनगौडा रवीपाटील आणि प्रकाश जमदाडे यांचा समावेश आहे.

या सर्वांना चंद्रकांत पाटील यांनी भेटले . सर्वांना एकत्र बसवण्यात आले. चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रत्येका बरोबर स्वतंत्र चर्चा करण्यात आली. बंडखोरी करू नका असे सांगण्यात आले. शिवाय विधान परिषद व महामंडळावर संधी देण्याची ऑफर ही देण्यात आली. मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच,अशी भूमिका माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जतच्या स्थानिक भाजपाने जाहीर केली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. इथे आता भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

भाजपाकडून जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र स्थानिक भाजप नेत्यांचा त्याला विरोध आहे. कोणालाही उमेदवारी द्या पण स्थानिकाला द्या अशी इथल्या नेत्यांची आहे. शिवाय पडळकर हे विधान परिषदेवरही आहेत. मात्र विरोध असतानाही पडळकरांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते त्यांच्या विरोधात गेले आहेत. त्याचा फटका भाजपला बसण्याची चर्चा मतदार संघात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.