देशभरात वेगवेगळी राज्य सरकारे तसेच केंद्र सरकारद्वारे अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यातच पोस्ट ऑफिस एकापेक्षा एक अधिक सरकारी बचत योजना चालवते, ज्यामध्ये गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसह कर बचत आणि उच्च परताव्याची ही हमी दिली जाते.
यात लहान मुलांच्या शिक्षणाच्या बचतीपासून ते जेष्ठ नागरिकांच्या बचत योजना अश्या अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही भरपूर पैसे मिळवू शकता.
आजकाल अनेक लोकंही निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, असा विचार करून गुंतवणूक करतात. या बाबींवर पोस्ट ऑफिसने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही बचत योजना जेष्ठ नागरिकांसाठी काढली आहे जी गुंतवणुकीवर वार्षिक ८% टक्के पेक्षा जास्त व्याज देते.
सर्वोच्च सुरक्षा, उच्च परतावा आणि कर बचत फायदे
पोस्ट ऑफिसने ज्येष्ठ नागरिक बचत योजना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली योजना आहे, जी उच्च सुरक्षा, उच्च परतावा आणि कर बचतीच्या लाभांसह नियमित उत्पन्नाची संधी प्रदान करते.आपल्यातील काही जेष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठीही या योजनेचा वापर करता येईल. भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक या योजनेत वैयक्तिक किंवा संयुक्तपणे एकरकमी गुंतवणूक करू शकतात आणि कर सवलतीसह उच्च परतावा मिळवू शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांचा असून त्यावर वार्षिक ८.२ टक्के दराने व्याज मिळत आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना माहिती
मॅच्युरिटी: ५ वर्षकिती खाती उघडू शकतो?
व्याजदर : ८.२ टक्के वार्षिक
किमान गुंतवणूक : १००० रुपये
जास्तीत जास्त गुंतवणूक : ३० लाख रुपये
टॅक्स बेनिफिट : सेक्शन ८० c अंतर्गत उपलब्ध
अकाली बंद करण्याची सुविधा: उपलब्ध
नॉमिनी सुविधा : उपलब्ध
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही स्वतःचे एकाच खाते उघडू शकता तसेच तुम्ही तुमच्या पत्नीसोबत एक जॉईंट खाते उघडू शकता. याशिवाय पती-पत्नी दोघेही यासाठी पात्र असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळी खातीही उघडता येतील.या योजनेच्या परताव्यात तुमच्या एका खात्यात किंवा जॉईंट खात्यात जास्तीत जास्त ३० लाख रुपये आणि दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये जास्तीत जास्त ६० लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. ५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही हे खाते आणखी ३ वर्षांसाठी वाढवू शकता.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना कशी असेल?
सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त डिपॉझिट : ३० लाख रुपये
व्याजदर : ८.२ टक्के वार्षिक
मॅच्युरिटी पीरियड: ५ वर्षे
वार्षिक व्याज: २,४०,६०० रुपये
तिमाही व्याज: ६०,१५० रुपये
मासिक व्याज: २०,०५० रुपये
पाच वर्षांतील एकूण व्याज : १२,०३,०००
कुल परतावा: ४२०,३००० लाख रुपये
नियमित उत्पन्न किंवा एकरकमी व्याज
जर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला दर 3 महिन्यांनी ६०,१५० रुपये किंवा मासिक२०,०५० रुपये मिळतील. तर जर तुम्ही हे पैसे काढले नाहीत तर तुम्हाला ५ वर्षात एकूण १२ लाख रुपये व्याज मिळेल. त्याच ५ वर्षांनंतर तुमचे संपूर्ण जमा झालेले भांडवल म्हणजेच तुम्ही केलेली गुंतवणूकही परत मिळेल. मॅच्युरिटीनंतर तुम्ही पुन्हा एकदा त्यात गुंतवणूक करू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.