पुणे : शासकीय कार्यालयात दुचाकीने येणार्या कर्मचार्यांना आता हेल्मेट बंधनकारक असणार असून, याची अंमलबजावणी आजपासून केली जाणार असून, पुणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या
बाहेर आरटीओची पथके तैनात असणार असून, कर्मचार्यांमध्ये हेल्मेटबाबत
जनजागृती देखील केली जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्यांना आता हेल्मेट
वापरावे बंधनकारक असणार आहे.
राज्यात रस्ते अपघातात मृत्यू होणार्यांत दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणार्यांची संख्या मोठी आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या सूचनेनासार राज्य परिवहन विभागाकडून हेल्मेट वापराबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. पोलीस देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करतात. मात्र, त्यानंतरही हेल्मेट वापरणार्यांची संख्या कमीच असते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी शहरातील शासकीय कार्यालयात दुचाकीवरून येणार्या कर्मचार्यांना हेल्मेट बंधनकारक केले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता. या निर्णयाची आता आरटीओकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. आजपासून (दि.२५) शासकीय कार्यालयांच्या बाहेर हेल्मेट तपासणी केली जाणार आहे.
शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या बाहेर आरटीओची पथके तैनात असणार आहेत. दरम्यान, तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दोन वर्षांपुर्वीच याबाबतचे परिपत्रक काढले होते. सरकारी कार्यालयात दुचाकीस्वार विनाहेल्मेट आल्यास कारवाई करावी आणि कार्यालयातील अधिकार्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणालाही सवलत देऊ नये, असे यामध्ये म्हटले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. अखेर आता आरटीओकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
…तर दुचाकीस्वार नागरिकांवरही कारवाई
सरकारी कार्यालयात विनाहेल्मेट येणार्या दुचाकीस्वार कर्मचार्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर विविध कामांसाठी सरकारी कार्यालयांत येणार्या इतर नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानूसार शहरातील विविध सरकारी कार्यालयांबाहेर हेल्मेट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी आरटीओचे पथके तैनात केली जातील.- स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.- स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.