सांगली विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना खलिफा मुस्लीम नाभिक समाज संघटनेच्या वतीने लेखी सक्रिय पाठिंबा दिला आहे.
जनतेचे ज्वलंत प्रश्न, महागाई, बेरोजगारी तसेच राष्ट्रीय एकात्मता अभाधित राहावी या मुद्द्यांना आपण प्राधान्य द्यावे. मदन भाऊ पाटील यांच्या विचाराने आपण कार्य करीत आहात. तसेच आपली सामाजिक जाण, समाजाप्रती असणारी बांधिलकी लक्षात घेऊन आमचे असंख्य खलिफा मुस्लीम नाभिक संघटनेचे पदाधिकारी व त्यांचे सर्व कुटुंबीय मित्रपरिवार आपणास सामाजिक जाणिवेने सक्रिय पाठिंबा देत आहोत असे सांगली खलिफा नाभिक संघटनेच्या वतीने सांगितले आहे .
आपण भविष्यात सर्व सामान्य जनतेचे प्रश्न व विकासावर आधारित कार्य करणार यात काही शंका नाही. आपल्या उमेदवारीने सर्वसामान्य जनता आपला घरचा उमेदवार आहे असे म्हणून प्रचारात स्वतःला झोकून देत आहे. म्हणूनच आपला या विधानसभेत मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे .
आपल्या उमेदवारीने आमच्या मनी मानसी आनंदाचे लक्ष लक्ष दीप उजळले आहेत. आपण असेच समाजसेवेचे एक एक शिखर पादाक्रांत करीत राहावे अशीही अपेक्षा या समाजाने व्यक्त केली आहे. यावेळी शब्बीर खलिफा, हुसेन खलिफा, रमजान खलिफा, जमीर खलिफा, बंदेनवाज खलिफा, शब्बीर खलिफा, सलीम खलिफा, अब्दुल खलिफा, मेहबूब खलिफा, शहासाब खलिफा, रफिक खलिफा, रेहान खलिफा, असिफ खलिफा, असिक खलिफा, नवीलाल खलिफा, नजीर खलिफा, ताजुद्दीन खलिफा यासह सांगली खलिफा मुस्लीम नाभिक समाज संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.