Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ना सत्तेसाठी ना पदासाठी आम्ही फक्त विकासासाठी : मोनिका कदम - पाटील

ना सत्तेसाठी ना पदासाठी आम्ही फक्त विकासासाठी  :, मोनिका कदम - पाटील 


दादा घराणाची एकी  लोकसभेनंतर ही  विधानसभेत  दाखवुन देणार - मोनिका कदम-पाटील 

सांगली: माजी मंत्री कै . मदन पाटील यांच्या निधनानंतर वसंतदादा घराण्यावर झालेली पोकळी भरून काढण्यासाठी दादा घराणे लोकसभेनंतर  पुन्हा  विधान सभेच्या निवडणुकीत एकवटले आहे. त्यामुळे कार्यकर्ते व सांगलीकर जनता अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारात रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. 

सांगली शहरामध्ये असलेल्या समस्या पुरपरिस्थिती,  शेरीनाला,  शुध्द पाणी,  रस्ते गटारी, स्वच्छता , खेळाडुंना चांगले प्रशिक्षण,  स्वच्छ व सुंदर सुफलाम सांगली बनविण्याचा मानस जयश्री पाटील यांनी केला आहे. आज प्रभाग 19 मध्ये अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मोनिका कदम-पाटील यांनी स्वतः रस्तावर उतरुन सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्यावर व गाठीभेटीवर भर ठेवला आहे .

विधानसभेची लढाई भाजप विरुद्ध अपक्ष उमेदवार अशीच असणार आहे . आतापर्यंत महानगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समिती  मधुन, जिल्हा परिषद गटानुसार केलेल्या कामाच्या जोरावर व सांगली, कुपवाड  शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या आग्रहास्तव ही निवडणुक  लढवित आहोत .   आतापर्यंत आमच्या घराण्यावर पक्षांने अनेकदा अन्याय केला आहे . लोकसभेला  विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवार फिक्स तुम्ही कामाला लागा असा आदेश पक्षांनी दिला होता . मात्र अचानक राजकीय घडामोडी घडल्याने विशाल पाटील यांना पक्षाचे तिकीट नाकारले . त्यांना अपक्ष निवडणुक लढवावी लागली जनतेने व कार्यकर्त्यांनी ही निवडणुक हाती घेऊन विशाल पाटील यांना भरघोस मतांनी निवडुन आणले. आता तोच पॅटर्न सांगली विधानसभेच्या निवडणुकीतही करायचा जनतेने ठरवले आहे असे प्रतिपादन मोनिका पाटील यांनी प्रभाग 19 मधील प्रचारा दरम्यान केले. त्यांनी जयश्री पाटील यांच्या  हिरा या चिन्हासमोरील बटन दाबुन भरघोस मतांनी विजयी करा असा आवाहनही केले. यावेळी मोनिका  कदम , महेश करणी,  परेश आलदर,  विठ्ठल जावीर,  भरत मसराज,  अनुराग जाधव,  रमेश वर्मा,  महादेव हजारे , सचिन कदम,  गणेश मद्रासी आदी उपस्थित होते .




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.