धार्मिक कार्यक्रमासाठी रुग्णवाहिकेतून प्रवास केल्याप्रकरणी मोदीच्या मंत्रिमंडाळातील एका मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिशूर पूरम उत्सवाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्याच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्रिशूर पूरम हा केरळमधील प्रसिद्ध मंदिर उत्सव आहे. गोपी यांनी रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याचा आरोप राज्यातील काँग्रेसच्या एका नेत्याने केला होता. तसेच त्रिशूर उत्सवात गोपी यांच्यामुळेच गोंधळ निर्माण झाल्याचेही काँग्रेस नेत्याने म्हटले होते. सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
सुरेश गोपी यांनी हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. उत्सवात गोंधळ निर्माण झाल्याने काही तरुणांनी आपल्या बचावासाठी आपल्याला रुग्णवाहिकेत बसवल्याचा दावा गोपी यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.