Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला

सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
 

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड कायदा अधिकारी विजय मग्गु याला ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यानंतर तपास पुढे नेत असताना सीबीआयने विजय मग्गु यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा मोठा धक्का बसला.

सीबीआयने विजयच्या घरातून ३.७९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. रोकड मोठ्या प्रमाणात सापडली. विजय मग्गु यांच्या व्यतिरिक्त सीबीआयने आणखी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सीबीआयने ही कारवाई विजय मग्गु यांच्यावर ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून केली.

याप्रकरणी सीबीआयने ७ नोव्हेंबर रोजी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी पहिल्यांदा दुसीबचे कायदा अधिकारी विजय मग्गु, एक खासगी व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती आहे. या सर्वांविरुद्ध ४ नोव्हेंबर रोजी सीबीआयमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

मिळालेली माहिती अशी, आरोपी विधी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ४० लाख रुपयांची लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या बदल्यात, अधिकाऱ्याने त्यांची दोन दुकाने डीसील करुन आणि कोणत्याही त्रासाशिवाय त्यांना चालवू देणार असे सांगितले होते. तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला आणि ७ नोव्हेंबर रोजी विजय मग्गुला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.
यानंतर सीबीआयने विजय मग्गुच्या निवासी जागेवरही छापा टाकला, यामध्ये त्यांच्याकडून ३.७९ कोटी रुपयांची रोकड आणि काही मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विजय मग्गु, आणखी एक खासगी व्यक्ती आहे त्यांच नाव सतीश आहे, तर आणखी एक व्यक्ती अनोळखी आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.