सांगली, दि.१०: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना कोळी महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे. या विधानसभा निवडणुकीत कोळी समाज महासंघाचे सर्व कार्यकर्ते तसेच समाजाचे लोक आमदार गाडगीळ यांचा प्रचार करतील असे राष्ट्रीय कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट चेतनदादा पाटील यांनी सांगितले.
ऍडव्होकेट पाटील तसेच महासंघाचे पदाधिकारी यांनी आमदार गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांना महासंघाचे पाठिंबा देणारे पत्र सादर केले. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी आणि राष्ट्रीय सरचिटणीस राजहंस टपके यांच्या सह्यांचे निवेदन त्यांनी सुधीर दादांना दिले.निवेदनात म्हटले आहे की महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रीय कोळी महासंघ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचे मनःपूर्वक स्वागत करतो. महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजाचे लोक घरोघर फिरून सुधीरदादांनी केलेल्या कामाची माहिती लोकांना देतील.त्यांना विजयी करण्यासाठी प्रचार करतील . आदिवासी कोळी समाज बांधव जातीचे दाखले तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. आमदार गाडगीळ यांनी निवडणुकीनंतर विधानसभेत या संदर्भात कोळी समाजाचा आवाज उठवावा अशी आमची अपेक्षा आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कोळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष कुमार कोळी, विकास सूर्यवंशी, रवींद्र नाईक, विजय कोळी, प्रकाश कोळी, शहराध्यक्ष राजेश कोळी, सुधीर चव्हाण आदि उपस्थित होते. आमदार गाडगीळ म्हणाले, कोळी महासंघाने दिलेल्या पाठिंबामुळे भाजप महायुतीचे बळ निश्चितच वाढले आहे. कोळी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी मी निश्चितच विधिमंडळात बाजू मांडीन. तसेच शासन दरबारी प्रयत्न करून त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करीन.
सांगली: सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना कोळी महासंघाने पाठिंबा जाहीर केला आणि पाठिंब्याचे निवेदन दिले. त्यावेळी महासंघाचे उपस्थित पदाधिकारी आणि सदस्य
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.