सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील वार्ड क्र.९ मधील उत्कर्ष हडको काॅलनी, सह्याद्री नगर व अभयनगर या भागात प्रामाणिकपणे काबाडकष्ट करुन स्वाभिमानाने जगणारे सांगलीकर आहेत. या भागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा या महत्त्वाच्या समस्या आहेत. मला निवडून दिल्यास मी या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द आहे अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली.याप्रसंगी महिलांनी पृथ्वीराज पाटील यांना ओवाळून औक्षण केले व भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार केला.
वार्ड क्र.९ मधील उत्कर्ष हडको काॅलनी, सह्याद्री नगर व अभयनगर भागात गृहभेटीत पृथ्वीराज पाटील यांनी नागरिकांशी भेटून संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. येत्या पाच वर्षांत या भागातील समस्या सोडविण्यासाठी आराखडा तयार केला असून हा भाग समस्यामुक्त करणार असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले. सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मला वार्ड क्र.९मधील नागरिकांनी भरघोस मतदान केले आहे याची जाणीव आहे. याहीवेळी या भागातील नागरिक मला भरघोस मते देऊन सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या पाच वर्षांत आमदारांनी या भागात स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी, रोजगार निर्मिती, युवा वर्ग व महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न केले नाहीत. घाम गाळून पोट भरणाऱ्या लोकांच्या व्यथा मला माहीत आहेत. काँग्रेस पक्ष हा कायम सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली व खासदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
यावेळी इलाही बारुदवाले, अल्ताफ पेंढारी, किरण सुर्यवंशी, इरफान केडिया, बलदेव गवळी, प्रशांत माने, धनंजय पाटील, जमीर मुल्ला, राजू कलाल, श्रीकांत शिंदे व वार्ड क्र.९ मधील महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.