विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेर महायुतीच्या शपथविधी कार्यक्रमाला मुहूर्त सापडला आहे. २ डिसेंबरला शपथविधी होणार असून
गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती
आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे.
एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यातील निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन, सरकार स्थापन करण्यात आपला कोणताही अडसर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबतही जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्रिपद आणि सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.
अखेर शपथविधी ठरला! कोण होणार मुख्यमंत्री? कोणाला कोणत्या खात्याची जबाबदारी? वाचा सविस्तर
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला केंद्रातही ऑफर अशल्याची माहिती आहे. केंद्रात प्रत्येकी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान अजित पवार याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाच्या नव्या सरकारमध्ये ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विद्यमान मंत्र्यांपैकी ७ जणांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी युवा चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.एकनाथ शिंदे यांनी केंद्रात मंत्रिपदाची ऑफर देण्यात येणार आली आहे. तर श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याच्याही चर्चा आहेत. दरम्यान कोणत्या पक्षाला कोणती खाती आणि कोणत्या नेत्याला महत्त्वाचं मंत्रिपद देण्यात येणार याचा चेहरा ठरला तर पुढची रणनिती ठरवताना महायुतीला सोपं जाणार आहे. शिवाय येत्या काळात महाराष्ट्रात महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकामध्ये युती राखण्यासाठीही मंत्रिपदाचं महायुतीत योग्य वाटप महत्त्वाचं असणार आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 2 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. शपथविधी सोहळ्यात काही मान्यवर अणि धार्मिक संतांचाही समावेश असणार आहे, अशी चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी ते शर्यतीतून बाहेर पडल्याचं जाहीर केलं आहे. सरकार स्थापनेच्या तयारीत असतानाच एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना नव्यानं स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावे, अशी विनंती केल्याचीही चर्चा आहे.जर मुख्यमंत्रिपद नाही मिळालं तर महायुती सरकारचा निमंत्रक म्हणून जबाबदारी द्यावी. शिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद द्यावे असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या वरिष्ठांकडे ठेवला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे २ डिसेंबरपर्यंत राज्यात आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात. कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, कोणाला महत्त्वाची खाती मिळतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.