कोल्लम (केरळ): आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
केरळच्या कोल्लम परिपल्ली मेडिकल महाविद्यालय रुग्णालयाच्या एका वरिष्ठ सर्जनवर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. या सर्जनने एका ज्यूनियर महिला डॉक्टरला आधी दारू पाजली आणि त्यानंतर तिच्यासोबत बलात्काराचा प्रयत्न केला, असे या ज्यूनियर महिला डॉक्टरने आपल्या तक्ररीत म्हटले आहे. या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ.सर्बीन मुहम्मद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. सेर्बिन मुहम्मद हा तिरुवनंतपुरमच्या उल्लूर येथील रहिवासी आहे.काय आहे संपूर्ण घटना -
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने तक्रारीत म्हटले की, डॉक्टरने आधी रुग्णालयातील खोलीत महिला डॉक्टरला दारू पाजली. यानंतर तिच्यासोबत दुष्कर्म केले. या घटनेची पहिली तक्रार वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्याला केली होती. यानंतर विभागीय तपासणीत डॉ. सेर्बिन याला दोन आठवड्यांसाठी करण्यात आले होते. यानंतर, काल महिला डॉक्टरने पोलिसांकडे सविस्तर जबाब नोंदवला. या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
डॉक्टर फरार -
पोलीस चौकशीदरम्यान, तक्रारदार महिलेने सांगितले की, डॉक्टरने ती नशेत असताना तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकरणी आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डॉक्टर फरार आहे. तर आरोग्य विभागाच्या चौकशीत आरोपी डॉक्टर हा दारू पिऊन ड्युटीवर आला होता, असेही समोर आले आहे. आरोग्य विभागानेही या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. आरोपीविरोधात लवकरात लवकर अटक करुन कठोर कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.