राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून अनेक नेत्यांनी सभांचा धडाका लावूनप्रचाराचा धुरळा उडवला आहे. आपल्या पक्षातील सर्वोच्च नेत्यानं आपल्यासाठी सभा घ्यावी अशी जवळपास सर्वच उमेदवारांची इच्छा असते.
त्यासाठी ते मोठा खर्च करायलाही तयार असतात, मात्र नेत्यांना सर्वच ठिकाणी प्रचारसभा घेणं प्रत्येकवेळी शक्य होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा रद्द झाल्याने शिवसेनेना उमेदवाराचा रक्तदाब वाढला व त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भाऊसाहेब कांबळे असे उमेदवाराचे नाव असून ते श्रीरामपूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. आता त्यांच्यावर रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिंदेंनी सभा रद्द केल्याचे समजताच कांबळेंचा रविवारी रात्रीच रक्तदाब वाढला. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदे यांची श्रीरामपूरमधील सभा रद्द झाल्यानं त्याचा धसका उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी घेतला. त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.भाऊसाहेब कांबळे यांनी महायुतीमधील नेत्यावरच आरोप केला आहे. कांबळे यांनी यावरून राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांचा माझ्यावर दबाव आहे. मला उमेदवारी देणारे हेच लोक आणि मागे घ्यायला लावणारे सुद्धा हेच लोक आहेत, असे कांबळे म्हणाले आहेत. माझ्या पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितले असते तर घेतली असती, पण आता मी ही निवडणूक लढविणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर मतदारसंघात शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात महायुतीतील दोन घटक पक्षच लढत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची आज (सोमवारी) कांबळेंसाठी सभाहोती. मात्र अचानक ही सभा रद्द करण्यात आली. शिंदे येणार नसल्याचे कळताच कांबळे यांना धक्का बसला. त्यांचा रक्तदाब वाढला आणि ते अत्यवस्थ झाले. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेदुसरीकडे कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सभा घेत आहेत. कानडेंसाठी तटकरे यांनी सभा घेतली आहे. शिंदे यांनी श्रीरामपूरमधील सभा रद्द केली असली तरी शेजारीच असलेल्या नेवासामध्ये त्यांची सभा होत आहे. यामुळे ही सभा रद्द करण्यामागचे कारण काय, याची चर्चा रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.