छातीतील हृदय रक्त पायांकडे पाठवत. पण पायांच्या वर रक्त पोटऱ्यांमधील स्नायूंद्वारे फेकल जातं. या कार्यामुळेच याला शरीरातील दुसर हृदय म्हटलं जात. पण ही क्रिया कशी होते हे तुम्हाला माहीत नसेल. आकुंचन पावल्यावर पंप करत शरीराची रचना अशी आहे की, जेव्हा पोटऱ्या आकुंचन पावतात, तेव्हा त्या रक्त परत वरच्या भागाकडे फेकतात. तुम्ही जितके वेळेस उभे राहता किंवा चालता तेव्हा पोटऱ्या आकुंचन पावतात आणि नंतर रिलॅक्स होतात.
हार्ट अटॅकपासून बचाव
जेव्हा पोटऱ्या हेल्दी राहतात आणि वेळोवेळी आकुंचन पावतात तेव्हा रक्त आरामात हृदयापर्यंत पोहोचतं. यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि त्यावर जास्त दबावही पडत नाही. प्रेशर कमी झाल्याने हृदय चांगलं काम करतं आणि मसल्स हेल्दी राहतात. आरामात रक्त पोहोचत असल्याने हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर किंवा हार्ट डिजीजचा धोका कमी राहतो.
पोटऱ्या कस करतात काम
चालल्याने किंवा उभे राहिल्याने पोटऱ्या रक्त पंप करतात. त्यामुळे हृदयरोग किंवा हार्ट अटॅकचा धोका कमी राहतो. याच कारणाने एक्सपर्ट नियमितपणे चालण्याचा सल्ला देतात. जेणेकरून ब्लड सर्कुलेशन सुरळीत रहातं आणि हृदयावर दबाव पडू नये.
बसून राहिल्याने होते समस्या
जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून राहता तेव्हा पोटऱ्या रिलॅक्स होतात. यादरम्यान त्या ब्लड पंप करत नाहीत. ज्यामुळे पायांमध्ये वेदना, सूज किंवा रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते. याचा हृदयावरही प्रभाव पडतो.
केवळ एक्सरसाईज पुरेशी नाही
जर तुम्ही विचार करत असाल की, दिवसातून एक तास एक्सरसाईज करणं पुरेसं आहे. तर तुम्ही चुकीचा विचार करताय. तुम्ही दिवसभर वेळोवेळी पायांचा वापर केला पाहिजे. ज्यामुळे दिवसभर हृदयाला आराम मिळतो. प्रयत्न करा की, एकाच जागेवर एकसारखं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बसू नये
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.