सांगली: दिवगंत मदनभाऊ पाटील यांनी स्क्रॅप विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे संसार उभे केले. या उपकाराची परतफेड विधानसभा निवडणुकीत करू. जयश्री पाटील यांच्या पाठीशी स्कॅ्रप संघटना ठामपणे उभी असल्याची ग्वाही संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली.
सांगली विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी प्रचारात आघाडी आहे. आज कोल्हापुर रस्त्यावरील स्क्रॅप बाजारला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जयश्री पाटील म्हणाल्या की, खोकी पुनर्सवनावेळी स्क्रेप विक्रेत्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पण मदनभाऊंनी त्यातून मार्ग काढत विक्रेत्यासाठी कोल्हापूर रोडवर जागा उपलब्ध करून दिली. विक्रेत्यांनी नेहमीच वसंतदादा घराण्याला साथ दिली आहे. या निवडणुकीतही हिरा या चिन्हासमोरील बटण दाबून साथ द्यावी, असे आवाहन केले.
माजी महापौर किशोर शहा म्हणाले की आपल्या भागातील सर्व नागरिक, महिला, व्यापारी वर्गाला पूर परिस्थितीवेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पुराच्या स्थितीतून मार्ग काढून तुमच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
स्कॅ्रप संघटनेच्या पदादिकार्यांनी मदनभाऊंच्या आठवणीला उजाळा दिला. त्यांचे उपकार विक्रेते कधीही विसरणार नाही. जयश्री पाटील यांना विधानसभेवर पाठवून मदनभाऊंना आदरांजली होऊ या, असे आवाहन प्रा. देवानंद जंबगी यांनी केले. यावेळी लियाकत बलबंड , अरिफ मुल्ला , निसार फकीर. उमेश चिनके, प्रताप चव्हाण, सादीक सय्यद, बादशाह शेख, जावेद मुलाणी, आसिफबारगीर, सलीम पखाली, रमेश खताळ, तौफिक मुल्ला, रियाज गजबरवाडी, अवधुत माने , हायदर चौधरी, रशिद बागणीकर, अब्बु सईद मुल्ला, जब्बार येळकुद्री, सुनिल घावट, अतुल पाटील, करण वाघमारे , झाकीर मुल्ला, अशोक ठोकळे, बाळासाहेब गायकवाड, सलीम बारगीर, अय्याज मुजावर, श्रीकांत शिदे, फारुक शेख यांच्यासह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.