Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विमान प्रवास झाला स्वस्त; बसच्या दरात विमानाचं तिकीट, एअर इंडियाची स्पेशल ऑफर

विमान प्रवास झाला स्वस्त; बसच्या दरात विमानाचं तिकीट, एअर इंडियाची स्पेशल ऑफर
 

एअर इंडिया एक्सप्रेसने एक अशी ऑफर आणली आहे जी तुमचे स्वप्न साकार करू शकते. एअर इंडिया एक्स्प्रेसने 'फ्लॅश सेल'ची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्हाला अत्यंत स्वस्त दरात परवडणारा विमान प्रवास करण्याची संधी मिळत आहे.

कारण आता एअर इंडिया एक्सप्रेसने एक अशी ऑफर आणली आहे जी तुमचे स्वप्न साकार करू शकते. एअर इंडिया एक्स्प्रेसने ‘फ्लॅश सेल’ची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्हाला अत्यंत स्वस्त दरात परवडणारा विमान प्रवास करण्याची संधी मिळत आहे. या सेलअंतर्गत १,४४४ रुपयांपासून प्रवास सुरू होणार आहे. जर तुम्ही कधीही विमानाने प्रवास केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

एअर इंडिया एक्स्प्रेसची ‘फ्लॅश सेल’ ऑफर
एअर इंडिया एक्स्प्रेसने ‘फ्लॅश सेल’मध्ये एक्सप्रेस लाइटचा प्रवास १,४४४ रुपयांपासून सुरू केला आहे, तर एक्स्प्रेस व्हॅल्यू फेअरची सुरुवातीची किंमत १,५९९ रुपये आहे. ही संधी गमावू नका, कारण ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि केवळ १३ नोव्हेंबर २०२४पर्यंत तुम्ही या ऑफेरमध्ये असलेला प्रवास बुक केला जाऊ शकतो. जाणून घेऊया ‘फ्लॅश सेल’ सेल ऑफर्सचा तपशील.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लॅश सेलच्या महत्त्वाच्या तारखा

एअर इंडिया एक्सप्रेस तुम्हाला स्वस्त विमानसेवा देत आहे. ‘फ्लॅश सेल’चा लाभ घेऊन विमानप्रवास करायचा असेल तर १३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत बुकिंग करता येईल. या दरम्यान तुम्ही १९ नोव्हेंबर २०२४ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान प्रवास करण्यासाठी फ्लाईट बुक करू शकता.

एक्सप्रेस लाइट & एक्सप्रेस बिझचे तिकीट दर
एक्सप्रेस लाइटचे तिकीट दर – या फ्लाईटची किंमत १,४४४ रुपयांपासून सुरू होते आणि तुम्हाला यात स्वतंत्रपणे ३ किलो केबिन बॅगेज मोफत मिळणार आहे. ज्यांना हा विमान प्रवास परवडत आहे त्यांच्यासाठी ही खास ऑफर आहे.त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले स्वप्न पूर्ण करा.

एक्सप्रेस बिझ तिकीट दर- बिझनेस क्लास मध्ये बसून ज्यांना लक्झरीचा अनुभव घ्यायचा असेल तर एअर इंडिया एक्स्प्रेसने एक्सप्रेस बिझवर २५ टक्के सूट दिली आहे. तुम्हाला देखील बिझनेस कलासने विमान प्रवास करायचं स्वप्न असेल तर ही उत्तम संधी आहे.
लॉयल्टी आणि विशेष सवलती

एअर इंडिया एक्स्प्रेसने लॉग-इन सदस्यांसाठी शून्य सुविधा शुल्क आकारण्यात आले आहे. याशिवाय लॉयल्टी मेंबर्ससाठी खास ऑफर देण्यात आली आहे, ज्याअंतर्गत ‘गॉरमेयर’ फूड, सीट आणि एक्सप्रेस अहेड सर्व्हिसवर २५ टक्के सूट मिळणार आहे. तसेच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि सैन्यदलासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसने विशेष सवलतीच्या ऑफर देत आहे.या ऑफरमुळे या सर्वसामान्य लोक आपला विमान प्रवास आणखी स्वस्त करू शकतात. एअर इंडिया एक्सप्रेस ‘फ्लॅश सेल’ अंतर्गत फ्लाईट बुक करायची असेल तर https://www.airindiaexpress.com/offer-details?offerid=Static_FLASHSALE या लिंकवर क्लिक करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.