Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेरच्या क्षणी समोर आला धक्कादायक सर्व्हे, सत्ताबदल की फोडाफोडी? वाचा आकडे

अखेरच्या क्षणी समोर आला धक्कादायक सर्व्हे, सत्ताबदल की फोडाफोडी? वाचा आकडे
 

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांसाय़ठी सगळे पक्ष मोठ्या मेहनतीनं प्रचार करत असून, आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. सध्याच्या विधानसभा निवडणुकांचा अंदाज घेण्यासाठी लोकसभा निवडणुका समजून घेणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर महायुतीने युद्धपातळीवर मोठे निर्णय घेतले आणि लाडकी बहीण सारख्या योजना लागू केल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र तेव्हा चांगलं यश मिळालेलं होतं. त्यानंतर आता बराच काळ उलटून असल्यानं सध्या राज्यातली स्थिती देखील बददली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या राज्यात नेमकं कसं वातावरण आहे? ते जाणून घेण्याचा प्रयत्न दैनिक भास्कर समुहाकडून करण्यात आला.
राज्यातील मतदार, राजकीय विश्लेषक, पत्रकार यांच्या मदतीनं करण्यात आलेल्या या सर्व्हेच्या माध्यमातून राज्यातील 288 मतदारसंघांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामाध्यमातून महायुतीसाठी काहीशी चिंता वाढणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालाप्रमाणेच हा निकालही महाविकास आघाडीच्या बाजूनं असण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पलिकडे जाऊन कोणत्या पक्षांना किती जागा मिळणार याच्या आकड्यांवरुन नेत्यांचं भवितव्य ठरणार आहे.

महायुतीला किती जागा मिळतील?
सध्या समोर आलेल्या अंदाजांनुसार 148 जागा लढवणाऱ्या भाजपला 80 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 30-35 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 15-20 जागा मिळतील असं चित्र आहे.
महाविकास आघाडीला किती जागा मिळतील?

महाविकास आघाडीचा विचार केल्यास, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 52 ते 65 मिळतील असा अंदाज आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्याही 50-55 जागा येतील अशी शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या यांच्या शिवसेनेला 30-35 जागांपर्यंतच यश मिळेल असं चित्र आहे.

अपक्ष आणि छोटे पक्ष किंगमेकर ठरणार?
राज्यातली निवडणूक आणखी एका कारणामुळे महत्वाची असणार आहे. कारण यंदा राज्यात अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 20 ते 25 उमेदवार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांवरच आता सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.