Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतापजनक! मुख्याध्यापक, शिक्षकांचं दानवी कृत्य; अभ्यासाच्या बहाण्यानं बोलवून अल्पवयीन विद्यार्थीनीवर वारंवार सामूहिक बलात्कार

संतापजनक! मुख्याध्यापक, शिक्षकांचं दानवी कृत्य; अभ्यासाच्या बहाण्यानं बोलवून अल्पवयीन विद्यार्थीनीवर वारंवार सामूहिक बलात्कार
 

अतिशय संतापजनक आणि धक्कादायक घटना छत्तीसगडमधून समोर आलीय. ज्या शिक्षकांना आई वडिलांनंतर श्रेष्ठ स्थान आणि गुरु पूजनीय मानतो, त्यांनीच दानवी कृत्य केल्याने एकच खळबळ माजलीय. 11 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर मुख्याध्यापकासह 4 जणांनी वारंवार सामूहिक बलात्कार केलाय. या क्रूरतेत मुख्याध्यापक, शिक्षक आणि एक वनरक्षक यांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडलीय. 
 

मीडिया रिपोर्टनुसार विद्यार्थीनी 17 वर्षांची असून ती घरी राहून अभ्यास करायची. 15 नोव्हेंबरला तिला सरकारी शाळेत शिकवण्याच्या नावाखाली कारमधून शिक्षक दुसऱ्या आरोपीच्या घरी घेऊन गेले. तिथे एक आरोपी पूर्वीपासून उपस्थितीत होते. या तिघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि सर्वात घृणास्पद म्हणजे या घटनेचा त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओदेखील बनवला. 

एवढंच नाही तर या नराधमाने तिला धमकी दिली, घटनेबाबत कोणालाही सांगितलं तर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येईल. हे नराधम एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा 22 नोव्हेंबरला मुलीला ब्लॅकमेल करुन भाड्याचा घरात बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीनंतरही मुलगी घाबरली होती. पण तिने हिंमत केली आणि या घटनेची पालकांना माहिती दिली. मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती पालकांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडित मुलीच्या आईने मंगळवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं. दरम्यान पोलिसांनी मंगळवारी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सरकारी शाळेतील तीन शिक्षकांसह चौघांना अटक केलीय.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.