सध्या सांगली विधानसभा निवडणुकीचे चांगलेच वारे वाहु लागले आहे. सांगली शहरातुन व ग्रामीण भागातून सांगली विधान सभा निवडणुकीच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांना वाढता पाठींबा पाहुन विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन घडणार असा विश्वास भोई समाज भूषण कै. विश्वनाथ शिंदे कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष शंकर शिंदे यांनी दिला . महायुती सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण ही योजना आणुन मते गोळा करण्याचा त्याचा डाव आहे . हा डाव जनताच हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. येणाऱ्या काळात आपण कायम माझ्या पाठीशी खंबीर राहा. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच शहराबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा असलेला उत्साह पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चितच होणार आहे असे अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील म्हणाल्या.
भोई समाज भूषण कै. विश्वनाथ शिंदे कल्याणकारी संस्थेच्या वतीने जाहीर पाठींबा देऊन जयश्री पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करणार असा विश्वास संस्येचे अध्यक्ष शंकर शिदे यांनी दिला .यावेळी अध्यक्ष शंकर शिंदे, उपाध्यक्ष सुरेश भोकरे, गणेश आपटे , यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.