मुंबई: पीएम किसान योजने ही मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही 31 डिसेंबरपूर्वी हे काम केलं नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे मोजून 10 दिवस बाकी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबरमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जारी केला होता. PM-किसान योजना, 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. जी जमीनधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये देते.
'पीएम किसान योजने' अंतर्गत 19 व्या हप्त्या खात्यावर कधी जमा होणार याची शेतकरी वाट पाहतोय. हा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. Agri Stack च्या सहाय्याने शेतकरी नोंदणीचे काम केले जात आहे, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत त्यांची शेतकरी नोंदणी करून घ्यावी, अन्यथा तुमची किसान निधी बंद केली जाईल.
शेतकरी नोंदणी करण्यासाठी, शेतकऱ्याला फक्त त्याचे आधार कार्ड आणि मोबाईल आवश्यक असेल, ज्यामध्ये ओटीपी किंवा फेस आयडीद्वारे शेतकरी नोंदणी केली जाते. https://upfr.agristack.gov.in या वेबपोर्टल आणि योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या फार्मर रजिस्ट्री यूपी या मोबाईल अॅपद्वारे शेतकरी सेल्फ मोडमध्ये स्वतःची नोंदणी करून शेतकरी रजिस्ट्री तयार करू शकतात.
शेतकरी नोंदणीचे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यात येईल. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना हप्ता येणार नाही असं सांगितलं जात आहे, त्यामुळे न विसरता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं अशा सूचना सरकारकडून दिल्या जात आहेत.
शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार असून आपत्ती काळात शेतकरी नोंदणीद्वारे दिलासा मिळणे सोपे होणार असून शेतकऱ्यांना बियाणे, खते, कृषी उपकरणे, बँक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड (KCC) यांवर शेतकरी नोंदणीद्वारे सवलत मिळणार आहे ते सहज मिळवा. जमिनीची फसवणूक थांबवणे हा शेतकरी नोंदणी करण्यामागील सरकारचा हेतू आहे. प्रत्येकाकडे किती जमीन आहे हे कळेल. त्यामुळे जमिनींचा गैरवापर टाळता येईल. शेतकऱ्यांना जमिनीवर उपलब्ध असलेल्या सुविधाही सहज मिळतील. भविष्यात शेतकरी नोंदणीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधव आपली शेतकरी नोंदणी जवळच्या लोकसेवा केंद्रातून करून घेऊ शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.