Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माहेरी जाते सांगून घरातून निघाली; बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेली, नवऱ्याचा 50 जणांना घेऊन हैदोस!

माहेरी जाते सांगून घरातून निघाली; बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेली, नवऱ्याचा 50 जणांना घेऊन हैदोस!
 

वैवाहिक जीवनात जोडीदारानं फसवणूक करणं, धोका देणं किंवा विवाहबाह्य संबंध असे प्रकार आजकाल सर्रास घडल्याचं ऐकायला, वाचायला मिळतं, त्यामुळे प्रसंगी संबंधित वैवाहिक जीवन संपुष्टात देखील येतं.  एक विवाहित महिला पतीची फसवणूक करत प्रियकरासोबत पळून गेली, त्यानंतर ती तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडली गेली. यावरून पतीने पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालत पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कारवाईची मागणी केली आहे.

झारखंड येथील देवघरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एक विवाहित महिला पतीला धोका देऊन प्रियकरासोबत पळून गेली. तीन दिवसांनंतर पोलिसांनी तिला एका हॉटेलमध्ये प्रियकरासोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले. या प्रकारावरून पती खूप संतापला आणि तो 50 गावकऱ्यांसह पोलीस स्टेशनला पोहोचला. तिथं त्याने गोंधळ घालत पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी प्रियकरासोबत राहण्यावर ठाम आहे. दोन्ही बाजूंची चौकशी केली जात आहे.
देवघर परिसरात ही घटना घडली. येथील सुभाष चौकातील एका हॉटेलमध्ये विवाहित महिलेला तिच्या प्रियकरासोबत पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मग ते तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने तीन दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. जेव्हा पतीला पत्नीबाबतचं सत्य समजलं तेव्हा तो पोलीस स्टेशनला पोहोचला. सोबत गावातील 50 लोक घेऊन गेला. पतीने सांगितले की, `मी आता माझ्या पत्नीसोबत राहू इच्छित नाही. मला घटस्फोट हवा आहे.` पोलिसांनी मोठ्या मुश्किलीने हा गोंधळ शांत केला. पत्नीदेखील प्रियकरासोबत राहण्यावर ठाम आहे.


महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, `सहा महिन्यांपूर्वी आमचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोन महिन्यांपर्यंत पत्नीचं वर्तन चांगलं होतं. तिला बॉयफ्रेंड आहे, हे मला माहिती नव्हतं. दोन महिन्यांनंतर ती सातत्याने माहेरी जाऊ लागली. मला तिचा संशय आला. पण ती दर दोन-तीन दिवसांनी माहेरी कशाला जाते हे मला माहिती नव्हतं. 28 नोव्हेंबरला ती पुन्हा माहेरी जात असल्याचं सांगत घराबाहेर पडली. मी तिच्या माहेरी फोन करून विचारलं असता, त्यांनी ती माहेरी आली नसल्याचं सांगितलं. मग मी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. एक डिसेंबरला पोलिसांनी तिला एका हॉटेलमध्ये परपुरुषासोबत रंगेहाथ पकडलं. तो माझ्या पत्नीचा प्रियकर असून तिच्या माहेरच्या गावात राहतो. जर पत्नीला तोच आवडत होता तर तिनं माझ्यासोबत असं काही करणं योग्य नाही. पत्नीने माझी फसवणूक केली असून, मला आता तिच्यासोबत राहायचं नाही.`

`मी जेव्हा पत्नीविषयी तिच्या माहेरच्या व्यक्तींना विचारू लागलो तेव्हा त्यांनी माझ्यावर आरोप केले. दोन दिवस तिच्या माहेरची मंडळी मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देत होती. आम्ही त्यांच्या मुलीची हत्या केली असल्याचा आरोप त्यांनी केला. पण सत्य वेगळंच होतं. मला न्याय मिळाला पाहिजे,` असं पीडित पतीनं सांगितलं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.