संतोष देशमुखांना टॉर्चर करून मारलं, त्यांच्या शरीरावर 56..., हत्या प्रकरणात पवारांच्या खासदाराने उडवली खळबळ
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. देशमुख हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा खुलासा केला आहे.
संतोष देशमुख यांनीा टॉर्चर करून मारलंय, त्याच्या शरीरावर 56 वण सापडले आहेत. डोळ्यावर, पोटावर, पाठीवर, छातीवर असे सगळ्या ठिकाणी हे वण आहेत. तसेच देशमुखांच्या छातीवर गुडघे ठेवून त्यांच्या बरगड्या मोडल्या आहेत, अशी अत्यंत क्करपणे संतोष देशमुख यांची हत्या केल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. बीडमध्ये बजरंग सोनवणे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट वाचून दाखवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.