पुणे: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी राज्याचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. विधानसभा अधिनवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार होणार असून मंत्री पदाची माळ कुणा-कुणाच्या गळ्यात पडेल याबाबत अद्याप नावं समोर आली नाहीत.
दरम्यान पुण्याचा पालकमंत्री कोण होणार यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपात संघर्ष सुरु झालाय. यावेळी भाजपला पुण्याचं पालकमंत्री मिळायलाच हवं अशी भूमिका पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप हे मित्रपक्ष आहेत. पण पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा विषय निघताच भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोस्तीत कुस्ती सुरु झाली आहे. कारण अडीच वर्षापूर्वी अजित पवार ज्यावेळी महायुती सरकारमध्ये सामील होताच त्यांनी पुण्याचं पालकमंत्रिपद स्वतःकडं घेतलं. तर चंद्रकांतदादांना पालकमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं. आता यावेळी मात्र पुण्याचं पालकमंत्रिपद भाजपलाच हवं असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाचा पुणे दौऱ्यावर होते,यावेळी त्यांना या संदर्भात विचारले असते त्यांनी सर्व माहिती लवकरच मिळेल, असे उत्तर दिले आहे.
रखडलेल्या प्रोजेक्टवर फडणवीस काय म्हणाले?
पुण्याच्या रखडलेल्या प्रोजेक्टवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याचा अजेंडा अडीच वर्षापूर्वीच सेट केला आहे. आता त्या अजेंडाला गती देणे हे महत्त्वाचे आहे ते आम्ही देऊ.
दादर हनुमान मंदिर प्रकरणी फडणवीस म्हणाले...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दादरच्या हनुमान मंदिराविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, न्यायालयाने मागच्या काळात निर्णय देऊन मंदिराची वर्गवारी केली आहे. जुनी मंदिर ही त्या वर्गवारीनुसार नियमित करता येतात. याबद्दल रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू. नियमात तरतूद आहे, त्यानुसार नियमितीकरन करून घेऊ. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यात वाचन संस्कृतीला चालना देणारा कार्यक्रम होत आहे. मागील वर्षी देखील मी कार्यक्रमाला आलो होतो. पुणेकरांना प्रदर्शनाला जो प्रतिसाद दिला तो थक्क करणारा होता म्हणूनच मी यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर निर्णय घेतला या कार्यक्रमाला आले पाहिजे. सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारे माझी सुरुवात होत आहे याचा मला आनंद आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.