काेरेगाव भीमा लढाईचे वास्तव
काेरेगाव भीमा हे नाव आपल्याला तेथे 1 जानेवारी 2018 मध्ये झालेल्या जातीय दंगलीमुळे माहीत आहे. अर्बन नक्षलवाद्यांनी तेथे एल्गार परिषदेचे आयाेजन केले हाेते.
त्यात सरकार विरुद्ध उठाव, सामाजिक विद्वेष पसरविणे अशा प्रकारचे काम करण्यात आलेले हाेते. त्याचाच परिणाम म्हणून तेथे पुढे दंगल उसळली. महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारी घटना म्हणून काेरेगाव भीमा हे नाव आता सर्वांच्या स्मरणात आलेले आहे. या नावाला बरेच लाेक भीमा काेरेगाव असेही म्हणतात. परंतु काेरेगाव हे गाव आहे व ते भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे त्यामुळे काेरेगाव भीमा हे वास्तविक नाव आहे. 1 जानेवारी 1828 राेजी इंग्रज विरुद्ध मराठे अशी लढाई झाली हाेती. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी जात असताना त्यांच्यासमाेर अचानक कॅप्टन फ्रान्सिस स्टँटन याच्या नेतृत्वाखालील 834 लाेकांची एक तुकडी आली. मराठ्यांचे सैन्य 28000 हाेते. 12 तास ही लढाई चालली.
त्यात इंग्रजांचे अर्ध्यापेक्षा अधिक सैनिक जखमी झाले. काही मारले गेले. परंतु पुण्यातून अधिक कुमक येईल या भीतीने मराठे मागे हटले. इंग्रजांचेही खूप नुकसान झाले. त्यामुळे ते सुद्धा मागे हटले. त्यामुळे या लढाईत काेणीही विजयी झाले नाही. इंग्रजांनी सुद्धा विजयी हाेण्याचा दावा केलेला नाही. या लढाईचे नेतृत्व पेशवे करीत असल्यामुळे इंग्रज विरुद्ध पेशवे असाही सामना लाेक याला म्हणतात. परंतु काही जातीय तेढ निर्माण करणारे लाेक याला महार विरुद्ध पेशवे अशी लढाई म्हणतात. वास्तविक पाहता इंग्रजांच्या ज्या तुकडीसाेबत पेशव्यांचे युद्ध झाले त्या तुकडीमध्ये महारांची संख्या जास्त हाेती हे वास्तव आहे. परंतु आपण विराट काेहली जिंकला असे म्हणत नाही तर भारत जिंकला असे म्हणताे किंवा विराट काेहली हरला असे म्हणत नाही तर भारताचा पराभव झाला असे आपण म्हणताे. त्यामुळे इंग्रज विरुद्ध मराठे या लढाईमध्ये इंग्रज जिंकले किंवा पेशवे हरले, मराठे हरले असे म्हणणे जास्त याेग्य आहे.
परंतु विनाकारण महारांनी पेशव्यांचा पराभव केला अशा पद्धतीचे वाक्य उच्चारले जाते आणि याचा उपयाेग समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्यासाठी केला जाताे हे दुर्दैव आहे. वास्तविकता ही लढाई इंग्रज किंवा पेशवे काेणीही जिंकले किंवा हरले नव्हते. तरीही इंग्रजांनी काेरेगाव येथे एक जयस्तंभ उभारला व त्यावर या लढाईमध्ये ज्यांना मरण आलेले आहे अशा 20 त्याचप्रमाणे जखमी झालेल्या 3 महार समाजाच्या सैनिकांची नावे काेरून ठेवलेली आहे. इंग्रजांचा हा कुटिल डाव आपण ओळखला पाहिजे. urban naxal-koregaon bhima वास्तविकता इंग्रजांच्या बाजूने हजाराेंच्या संख्येने भारतीय लाेक पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात लढले व त्यानंतरच्या अनेक लढायांमध्ये सुद्धा लढले. त्या काळामध्ये वेगवेगळे राजे हाेते. त्यांच्या सैन्यांमध्ये वेगवेगळ्या जातीचे लाेक सहभागी व्हायचे. ज्याला सैन्यात नाेकरी करायची आहे ताे त्या काळातल्या काेणत्या ना काेणत्या राजाच्या दरबारी सैन्यामध्ये नाेकरी करायचा. पेशव्यांच्या सैन्यांमध्ये सुद्धा महार, मातंग, रामाेशी, अशा दलित वर्गातील जातींचे लाेक लढत हाेते.
सिदनाक महार हे मराठ्यांच्या बाजूने लढणारे एक शूर महारजातीचे याेद्धा हाेते. त्यावेळी सैन्यामध्ये मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, गाेरखा रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट अशा वेगवेगळ्या रेजिमेंट हाेत्या. गाेरखा रेजिमेंटमध्ये गाेरखा जातीचे लाेक अधिक प्रमाणात असले तरीही इतरही समाजाचे लाेक त्या रेजिमेंटमध्ये असतात. रेजिमेंट ही देशाकरिता लढत असते त्यामुळे गाेरखा रेजिमेंटचा विजय हा भारताचा विजय असताे. ताे गाेरखा समाजाच्या लाेकांचा विजय नसताे. त्यामुळे काेरेगाव भीमाला महारांनी पेशव्यांचा पराभव केला अशा पद्धतीचे विधान हे जातीय विद्वेष वाढविणारे व चुकीचे आहे. urban naxal-koregaon bhima 1 जानेवारी 1927 ला पू. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या जयस्तंभाला भेट दिली. त्यावेळेस इंग्रजांनी महार समाजातील लाेकांवर लष्करामध्ये भरती हाेण्यासाठी बंदी घातलेली असावी कारण, बाबासाहेबांनी इंग्रजांनी महार समाजातील लाेकांवर लष्करामध्ये भरती हाेण्यावर घातलेली बंदी त्वरित उठवावी अशी मागणी केली हाेती.
अन्यथा आंदाेलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिला हाेता. काही लाेक ज्यांना दलितांचे नेते व्हायचे आहे ते लाेक या दिवसाला शाैर्य दिवस म्हणतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही या दिवसाचा शाैर्य दिवस असा उल्लेख केलेला नव्हता. 1927 च्या काेरेगाव भीमा जयस्तंभाला दिलेल्या भेटीनंतर जवळपास 29 वर्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत हाेते. या 29 वर्षांत ते कधीही काेरेगाव भीमाच्या जयस्तंभाला भेट द्यायला गेलेले नव्हते. त्या लढाईचे वर्णन सुद्धा कधी त्यांनी आपल्या भाषणांमध्ये केलेले नाही. काेरेगाव भीमाच्या लढाईला डाॅ. आंबेडकरांनी कधीही जातिअंताची लढाई म्हटलेले नाही. चवदार तळ्याचा सत्याग्रह सुद्धा त्यांनी संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने केलेला हाेता.
त्यांना हिंसेच्या मार्गाने चालणारे आंदाेलन मान्य नव्हते. ज्या गाेष्टीला बाबासाहेबांनी महत्त्व दिले नव्हते त्याला आता काही तथाकथित लाेक फार माेठे महत्त्व देत आहे व समाजामध्ये विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक समरसता अपेक्षित हाेती. आपल्या समाजातील लाेकांनी शिकावे व इतरांनी त्यांना आपल्या बराेबरीच्या नात्याने सन्मानाने वागवावे ही त्यांची अपेक्षा हाेती. परंतु अशा पद्धतीच्या एल्गार परिषदेसारख्या घटना आणि त्यानिमित्त पेटविल्या जाणाऱ्या जातीय दंगली या समाजातील सलाेखा नष्ट करण्यास कारणीभूत ठरत आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या तसेच समाजामध्ये ज्यांना जातीय सलाेखा असावा असे वाटते अशा सर्वच लाेकांनी सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या लाेकांपासून व घटकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे असे वाटते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.