Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किरण रासकर मिरज शहर पोलिस ठाण्याचे नवे प्रभारीनिरीक्षक सुगावकर यांची मुख्यालयात बदली सांगलीतील २४ पोलिस अंमलदारांना पदोन्नती

किरण रासकर मिरज शहर पोलिस ठाण्याचे नवे प्रभारी निरीक्षक सुगावकर यांची मुख्यालयात बदली  सांगलीतील २४ पोलिस अंमलदारांना पदोन्नती
 

सांगली: जत पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक किरण रासकर यांची मिरज शहर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मिरज शहरचे प्रभारी निरीक्षक अरूण सुगावकर यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सहीने बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलिस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सहीने पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले आहेत. पदोन्नती झालेल्यांमध्ये १२ हवालदार, ९ पोलिस नाईक, २ पोलिस शिपाई यांचा समावेश आहे. 

मिरज शहरचे मावळते निरीक्षक सुगावकर यांची विनंतीनुसार तर निरीक्षक रासकर यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२ पोलिस हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. ९ पोलिस नाईक यांना हवालदार पदावर तर ३ पोलिस शिपाई यांची हवालदार पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. ही पदोन्नती निवडसुचीनुसार, सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.