Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सापाचं डोकं कापतात अन् रक्त सैनिकांना देतात प्यायला, पण असं का?

सापाचं डोकं कापतात अन् रक्त सैनिकांना देतात प्यायला, पण असं का?
 
 
 मुंबई : अमेरिकी नौदलाचे सैनिक थायलंडमध्ये दर वर्षी कोब्रा गोल्ड सैन्य सरावासाठी जातात, तेव्हा त्यांना जंगलात जिवंत राहण्यासाठी कोब्राचं रक्त पिण्यास शिकवलं जातं. एवढंच नाही तर जंगलात जिवंत राहण्यासाठी त्यांना विंचू, सरडे, कोंबडी आणि इतर अनेक प्रकारचे जिवंत प्राणी खावे लागतात. याबाबतची छायाचित्रं पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि असं कसं होऊ शकतं असा प्रश्नदेखील तुम्हाला पडेल; पण हे खरं आहे की सैनिक अशा प्रकारचा सराव करतात. आता या प्रशिक्षणात काही बदल करण्यात आले आहेत.

अमेरिकी नौदलाचे सैनिक दर वर्षी खास सरावासाठी थायलंडला जातात. तिथं आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक कोब्रा गोल्ड या लष्करी सरावाचा हा एक भाग आहे. अमेरिका आणि थायलंड यांच्यातले लष्करी संबंध मजबूत करण्यासाठी 1982मध्ये हा लष्करी सराव सुरू झाला. यात जंगलात जिवंत राहण्यासाठी सराव करावा लागतो. हा सराव खूप भीतिदायक असतो. इथल्या सैनिकांचं जंगल प्रशिक्षण अतिशय धोकादायक असतं. त्यांच्याकडे खायला काहीच नसतं. त्यांना जंगलात आढळणारे कीटक, सरपटणारे प्राणी आणि साप खाऊन जगावं लागतं. या सरावावेळी सैनिकांना साप आणि विंचू यांच्यासह खाद्य वनस्पती आणि प्राणी ओळखण्यास शिकवलं जातं.


जंगलात अडकले तर जिवंत कसे राहणार?

या कोब्रा गोल्ड सरावात अमेरिकी नौदलाव्यतिरिक्त थायलंड, सिंगापूर, मलेशियासह अनेक देशांतले सैनिक सहभागी होतात. हे एक असं प्रशिक्षण आहे, ज्यात सैनिकांना त्यांच्या युनिटपासून वेगळं करून जंगलात अडकल्यास जगायचं कसं याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं.

तेव्हा पितात सापाचं रक्त

अशा स्थितीत सैनिक पाणी न मिळाल्यास सापाचं रक्त पितात. हा खूप भीतिदायक अभ्यास असतो. या वेळी खरोखर सैनिक कोब्रा किंवा सापाचं रक्त पितात. छायाचित्रांच्या माध्यमातून तुम्ही हे पाहू शकता. हा सराव दीर्घ काळ सुरू होता; पण आता तो थांबवला गेला आहे.

आता बंद केला आहे हा सराव

पेटासारख्या पशु हक्क संघटनांनी हा सराव थांबवण्यासाठी मोहीम सुरू केली होती. त्यानंतर सापाचं रक्त पिण्याची प्रथा बंद झाली; मात्र सापाचं रक्त प्यायल्याने अनेक सैनिकांना अस्वस्थ वाटत होतं.

सैनिकांना सापाचं रक्त कसं वाटलं?

काही सैनिकांनी सांगितलं की, सापाच्या रक्ताची चव थोडी गोड असते; पण हे रक्त पिण्यास सैनिक तयार नव्हते. हा खूप कठीण अनुभव असल्याचं सांगण्यात आलं. त्यांना रक्त पिण्याची कृती अस्वस्थ करणारी वाटली. विंचू, पालींचं सेवन कोब्रा गोल्ड प्रशिक्षणादरम्यान प्राणी, विंचू, टारेंटुला, सरडा यांसारखे सरपटणारे प्राणी आणि कोंबडीसारखे प्राणी खायला दिले जातात.

विंचू - प्रशिक्षणादरम्यान सैनिक विंचू खात असताना दिसले होते. हे विंचू खाण्यापूर्वी त्यांची नांगी काढून टाकली जाते.

टारेंटुला - खाण्यापूर्वी टारेंटुलाचे दात कसे काढले जातात, हे प्रशिक्षणादरम्यान शिकवलं जातं. जंगलात जिवंत राहण्यासाठीच्या तंत्रातली ही सर्वांत आवश्यक गोष्ट आहे.

गेको - हा एक छोटा सरपटणारा प्राणी आहे. हादेखील खाल्ला जातो. प्रशिक्षणाच्या आहारातला हा प्रमुख घटक असतो.

पाल - प्रशिक्षणात विविध प्रकारच्या पालींचा समावेश केला जातो. या पाली प्रोटीनचा स्रोत मानल्या जातात.

कोंबड्या - काही स्थितीत जिवंत राहण्यासाठी सरावादरम्यान कोंबड्या मारून खाल्ल्या जातात.


सैनिकांना कशी वाटली विंचवाची चव?

काही सैनिक विंचू कुरकुरीत असल्याचं सांगतात. त्याची तुलना कोळंबी किंवा इतर समुद्री जीव खाण्याच्या अनुभवाशी होते. खाण्याच्या तयारीवेळी विंचवाची नांगी काढून टाकण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यामुळे तो अधिकच स्वादिष्ट लागतो. काही सैनिकांनी सांगितलं, की विंचू आणखी मसालेदार बनवता येऊ शकतात किंवा शिजवले जाऊ शकतात. त्यामुळे त्यांची चव वाढते. एकंदरीतच विंचू खाता येतो यावर सर्वसाधारण एकमत आहे.

आता पर्याय कोणता आहे?

सैनिकांनी सापाचं रक्त पिण्यावर बंदी घालण्यात आल्यावर प्रशिक्षणात काही बदल करण्यात आले. आता प्रशिक्षणात प्राण्यांवर अवलंबून न राहता, जंगलातून पाणी मिळवण्याच्या पद्धतीवर भर दिला जातो. यात नैसर्गिक जलस्रोत ओळखणं आणि पाणी शुद्ध करण्याच्या पद्धतींचा समावेश आहे.
खाण्यायोग्य वनस्पतींची ओळख

सैनिकांना विविध खाद्य वनस्पती आणि कीटक ओळखण्यास शिकवलं जातं. यामुळे जिवंत प्राणी किंवा प्राणिज पदार्थ खाण्याची गरज कमी होते.

काही धोकादायक सैन्य प्रशिक्षणं

रशियन स्पेट्सनाझ प्रशिक्षण एलिट रशियन स्पेट्सनाझ सैनिक हे कठीण प्रशिक्षणातून तयार होतात. यात त्यांनी चिलखत परिधान केलं, की त्यांच्यावर गोळी झाडली जाते. गोळीबार करताना आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि लढाईची सवय व्हावी यासाठी प्रशिक्षणार्थींना त्यांचे प्रशिक्षक छातीत गोळी घालतात. युद्धाच्या मानसिक तणावासाठी तयार करणं हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे; पण या प्रशिक्षणाबाबत सैनिकांच्या मनात भीती असते.
हात-पाय बांधून बुडवलं जातं

यूएस नेव्ही सील हे एक भयानक प्रशिक्षण असतं. याची प्रत्येकाला भीती वाटते. यात पाण्यात बुडवण्यापूर्वी त्यांचे हात-पाय बांधले जातात. मग त्यांना पोहणं किंवा तळाशी असलेल्या वस्तू बाहेर काढणं अशा गोष्टी कराव्या लागतात. पाण्यात असताना आत्मविश्वास वाढावा आणि जिवंत राहण्याचा विश्वास निर्माण व्हावा, यासाठी हे प्रशिक्षण दिलं जातं.

आठवडाभर झोपू दिलं जात नाही

फिलिपिन्स नेव्ही सील्स हेल वीक नावाच्या अत्यंत कठीण प्रशिक्षणातून घडतात. यात सैनिकांना आठवडाभर झोपू दिलं जात नाही. आठवडाभर चालणाऱ्या या कठीण प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना त्यांच्या मर्यादेपर्यंत ढकलण्यासाठी, त्यांच्या शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक लवचिकतेची चाचणी घेण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण डिझाइन केलं जातं.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.