Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर
 

नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात कृषी सहाय्यक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. 

कृषी सहाय्यक पदाची भरती ११ महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.एससी मध्ये दोन पदवी प्राप्त केलेली असावी.तसेच उमेदवारांना शेतीतील कीड आणि रोगांचे ज्ञान असावे.

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, रायगड येथे ही भरती होणार आहे.या नोकरीसाठी अर्जाचा तपशील तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळेल. हा अर्ज भरुन प्रधान अन्वेषक आणि किटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र रायगड येथे पाठवायचा आहे.
 
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.मुलाखतीच्या वेळी तुम्हाला मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहायचे आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे. उमेदवारांची मुलाख १८ डिसेंबरला घेतली जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.