Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीः ढालेवाडीतील जवानाचा हृदयविकारामुळे मृत्यू

सांगलीः ढालेवाडीतील जवानाचा हृदयविकारामुळे मृत्यू
 

नागज : ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील स्वप्निल हणमंत साळुंखे (वय 32, सध्या रा. भिवंडी, मुंबई) या जवानाचा, ते सुटीनिमित्त गावी आले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 22) भिवंडी येथे घडली असून त्यांच्यावर मंगळवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या मूळ गावी ढालेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

स्वप्निल साळुंखे हे बारा वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. सध्या ते पंजाबमधील पठाणकोट या ठिकाणी सेवेत होते. दहा दिवसापूर्वी ते कुटुंबीयांना घेऊन सुटीवर आले होते. सुटीवर आल्यावर भिवंडी मुंबई येथे ते कुटुंबीयांसमवेत राहत होते. दरम्यान, रविवारी फिरायला गेले असता स्वीमिंग टँकमध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने ढालेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता ढालेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.