मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर राज्यामध्ये काँग्रेस पक्षात मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील हटवले जाणार आहे. तशी नाना पटोले यांनी देखील प्रदेशाध्यक्षपासून मुक्त करा, अशी विनंती त्यांनी केली आहे. यातच आता काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन ते तीन नेत्यांची नावे समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उभे केलेल्या १०५ उमेदवारांमधून फक्त १६ जागा जिंकल्या. स्वातंत्र्यनंतरची आजवरची काँग्रेसची ही सर्वाधिक खराब कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे पटोले यांचा लगेच राजीनामा मागितला जाईल अशी शक्यता होती. मात्र निकालानंतर जवळपास २० दिवसांनी पटोले यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे समजत आहे. यातच आता प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पटोले यांनी लगेचच दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चवहाण, बाळासाहेब थोरात यांनीही दिल्लीत जाऊन काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा केली. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी अलिकडेच महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याचे संकेत दिले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.