मुंबई : राज्यातल्या महत्त्वपूर्ण जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर महायुती सरकारमध्ये रस्सीखेच सुरू आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावर राहण्याची इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याने गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा परत एकदा चर्चेत आला आहे.
गडचिरोली हा राज्यातला मागास माओवाद प्रभावी जिल्हा असला तरी गेल्या काही वर्षात पालकमंत्री पदाच्या दृष्टीने या जिल्ह्याला वेगळच महत्त्व प्राप्त झाला आहे. सर्वात आधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले आर आर पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारलं होतं. त्यानंतर राज्याचे नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री झाले होते. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा पालकत्व स्वीकारलं होतं.
गडचिरोलीचे पालकमंत्री असलेला राज्याचा मुख्यमंत्री होतो हे एकनाथ शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने स्पष्ट झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला कलाटणी मिळू शकते अशी आता चर्चा सुरू झाली आहे. तसेच एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत. अद्याप कोणत्या जिल्ह्याचे पालकत्व कोण स्वीकारणार याबाबत कोणताही निर्णय झालेल नाही. परंतु दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.
गडचिरोलीच्या नागरिकांची मागणी
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दोन दिवसात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बसून चर्चा करणार त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घोषित करतील. गडचिरोली जिल्ह्याचे मुख्यमंत्री जर पालकत्व घेत असतील तर त्या जिल्ह्याला मोठा न्याय मिळेल. गडचिरोलीची मागणी आहे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री यांनी जबाबदारी घ्यावी. गडचिरोलीचं सर्व लोक पालकत्व हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं पाहिजे अशी मागणी करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.