Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तीन कोटीच्या बदल्‍यात पोलिसानेच पळवले गुन्हेगाराला !

तीन कोटीच्या बदल्‍यात पोलिसानेच पळवले गुन्हेगाराला !
 

रायबंदर पणजी येथील गुन्हे अन्वेषण खात्याच्या लॉकपमधून जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्‍या एका आरोपीला चक्‍क पोलिसानेच पळवून नेले आहे. पणजी येथे ही धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धकी उर्फ सुलेमान खान असे या आरोपीचे नाव आहे. त्‍याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पोलीस अमीत नाईक याला तब्बल ३ कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती असे वृत्त आहे. 

आपल्‍याला तुरुंगातून बाहेर काढून कर्नाटकात सोडल्यास तीन कोटी रुपये तुला कॅश मध्ये देऊ असे आश्‍वासन सलमान याने अमीत नाईक याला दिल्याचे कळते. सुरक्षेला असलेल्‍या अमीत नाईक या पोलिसाने सलमान याला तुरुंगातून बाहेर काढून आपल्या दुचाकीवरून गोव्याच्या बाहेर नेले. या घटननेनंतर अमित नाईक हा हुबळी पोलिसांना शरण आला. त्याला गोवा पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

गोव्यातील जमिनी बनावट कागदपत्रे करून विकल्‍याप्रकरणी अटकेत असलेला सिद्धकी उर्फ सलमान खान हा गुन्हे अन्वेषण खात्याच्या लॉकपमध्ये होता. या लॉकअपच्या बाहेर अमीत नाईक सुरक्षेला होता. आरोपीने नाईक याला तीन कोटीची ऑफर दिली. या आमिषाला बळी पडून अमीत नाईक याने सुलेमान याला परवा रात्री अडीच वाजता तुरुंगातून बाहेर काढले व त्याला आपल्या दुचाकीवरुन गोव्याबाहेर कर्नाटकात नेले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.