Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हृदयाची प्रत्येक नस होईल स्वच्छ, २० रुपयांच्या 'या' मसाल्यांचा दैनंदिन आहारात करा समावेश, ब्लॉकेजचा धोका होईल कमी

हृदयाची प्रत्येक नस होईल स्वच्छ, २० रुपयांच्या 'या' मसाल्यांचा दैनंदिन आहारात करा समावेश, ब्लॉकेजचा धोका होईल कमी
 
 
चुकीची जीवनशैली, वातावरणात सतत होणारे बदल, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.

खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. शरीरात तेलकट तिखट पदार्थांच्या सेवनामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास सुरुवात होते. खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडते. चुकीच्या जीवनशैलीच्या परिणामांमुळे कमी वयातच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. यामागेचे प्रमुख कारण म्हणजे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानंतर रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. यामुळे आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या नसांमध्ये चिटकून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी दालचिनी अतिशय प्रभावी आहे. दालचिनीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शिवाय या मसाल्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी झाल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. दालचिनीमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट गुणधर्म श्वासोच्छवास आणि रक्तवाहिन्यांसंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. त्यामुळे दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे.
मागील अनेक वर्षांपासून हळदीचा वापर जेवणातील पदार्थांमध्ये केला जात आहे. हळदीमध्ये असलेले क्युमिन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे हळदीच्या पाण्याचे किंवा हळदीच्या दुधाचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते, ज्यामुळे आरोग्य सुधारते. शिवाय कर्क्युमिनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात. शरीराला आलेली सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे.
गोड पदार्थ बनवताना वेलचीचा वापर केला जातो. वेलचीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. वेलचीमध्ये असलेले फायब्रिनोलिटिक गुणधर्म रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून रोखतात. शिवाय शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलची अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही वेलचीचे दूध किंवा वेलचीचा चहा पिऊ शकता.

आरोग्यासंबंधित अनेक समस्यांवर लसूण अतिशय प्रभावी आहे. लसूण खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. लसूणमध्ये आढळून येणारे एलिसिन नावाचे संयुग रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. रिकाम्या पोटी नियमित २ किंवा ३ लसूण खाल्यास हार्ट ब्लॉकेजचा धोका कमी होतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.