Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टरकडून डॉक्टरला शिवीगाळ, धक्काबुक्की!

डॉक्टरकडून डॉक्टरला शिवीगाळ, धक्काबुक्की!
 

'हृदयविकाराचे ऑपरेशन केलेल्या रुग्णाला अतिदक्षता विभागातून बाहेर काढू नका,' असे सांगूनदेखील रुग्णाला दुसर्‍या विभागात का हलविले,' अशी विचारणा एका हृदय तज्ज्ञ डॉक्टरने दुसर्‍या हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरला केली असता, याचा राग आल्याने त्या डॉक्टरने दुसर्‍या डॉक्टरला चक्क शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

हा प्रकार शिर्डी येथील श्रीसाई संस्थानच्या सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये घडला. देवदूत म्हणून समजल्या जाणार्‍या डॉक्टरने दुसर्‍या डॉक्टरवला शिवीगाळ व धक्काबुक्की करणे, ही बाब अशोभनिय आहे, अशा आशयाची चर्चा शिर्डीत सुरू आहे.
श्रीसाईबाबा यांनी त्यांच्या हयातीत हजारो रुग्णांना आजारांवर उदी देवून, त्यांना पिडामुक्त केल्याने बाबांच्या श्रद्धेपोटी विविध राज्यांतून दररोज शेकडो रुग्ण शिर्डी येथील श्रीसाईबाबा सुपर स्पेशलिटी व श्रीसाईनाथ हॉस्पिटल येथे उपचार घेण्यास येतात. शिर्डीतील श्रीसाईनाथ रुग्णालयातात रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रीया केली जाते. श्रीसाई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे अल्प दरात मेंदू, हृदय, किडणी, हाडांसह पोटाच्या विविध विकारांवर अल्प दरात शस्त्रक्रीया केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात.

शिर्डीतील हृदय विभागात काही दिवसांपासून एका हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरकडून दुसर्‍या हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरला त्रास दिला जातो, अशी चर्चा सुरु आहे. याची सत्य प्रचिती या प्रकारातून आली. श्रीसाई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधील काही डॉक्टर्स रुग्णांना योग्य वागणूक देत नाहीत. याप्रकाराबाबत रुग्णांनी अनेकदा तक्रारी केल्या, परंतू प्रशासन या तक्रारींकडे गांभीर्याने पहात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्काबुक्की करण्याच्या या प्रकरणी श्रीसाई संस्थान प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संदीप सोनवणे, राष्ट्रवादी, राहाता तालुकाध्यक्ष. 'श्रीसाई संस्थान सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे एका हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरने दुसर्‍या हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरला शिवीगाळ करुन, मारहाण केली. हा प्रकार डॉक्टरांच्या पेशाला शोभनिय नाही. या अगोदर मारहाण करणार्‍या डॉक्टरने दुसर्‍या डॉक्टरांना त्रास दिला आहे, अशी माहिती आमच्याकडे आली आहे. या डॉक्टरच्या चुकीमुळे अनेक रुग्णांना त्रास झाला आहे. श्रीसाईबाबा संस्थांने तत्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून, दोषी डॉक्टरवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा राहाता तालुका राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते याप्रश्नी आंदोलन करतील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.